वॉचमन म्हणाला चल चॉकलेट आणि १४ वर्षीय मुलीला केलं गर्भवती...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

डोंबिवली - आपल्या आसपास अत्यंत गरुणास्पद आणि विकृत घटना घडत असतात. यातील अनेक घटना समोर येताही नाहीत. मात्र आता या गोष्टींबाबत माध्यमांमधून  वाच्यता झाल्याने आपल्याला न्याय मिळेल म्हणून पीडित कुटुंब किंवा महिला सजग झाल्यात. याच माध्यमातून समाजातील विकृत घटकांना शिक्षा देखील व्हायला लागलीये.

अशीच एक अत्यंत धक्कादायक, विकृत आणि घृणास्पद घटना मुंबईनजीकच्या डोंबिवलीतून समोर आलीये. 

मोठी बातमी -  मुंबई 'नाईट लाईफ'मध्ये रिलीज होणारा 'हा' आहे पहिला सिनेमा

कल्याण डोंबिवली भागात सातत्याने बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना पाहायला मिळतेय. एका  आकडेवारीनुसार २०१८ मध्ये कल्याण डोंबिवलीत ७४ तर २०१९ मध्ये ७९ बलात्काराच्या घटना घडल्यात. याचसोबत मोठ्या प्रमाणात अनेक गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

डोंबिवली  सुनील नगर परिसरात एक नराधम वॉचमन हा पीडित मुलीचं वयाच्या ११ व्या वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. ही पीडित मुलगी आता १४ वर्षांची आहे. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर हा सगळं प्रकार समोर आलाय. सदर वॉचमनचं नाव उत्तम निकाळजे असं आहे. हा वॉचमन या मुलीला चॉकलेट आणि पैसे देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार करायचा. 

मोठी बातमी - कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवला जाणार

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी वॉचमन उत्तम निकाळजे याला बेड्या ठोकळ्यात.  आरोपीला कल्याण कोर्टात हजर केल्यानंतर त्याला 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

horrible incident happned in dombivali watchman arrested under pocso act

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: horrible incident happned in dombivali watchman arrested under pocso act