esakal | मुंबई 'नाईट लाईफ'मध्ये रिलीज होणारा 'हा' आहे पहिला सिनेमा
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई 'नाईट लाईफ'मध्ये रिलीज होणारा 'हा' आहे पहिला सिनेमा

मुंबई 'नाईट लाईफ'मध्ये रिलीज होणारा 'हा' आहे पहिला सिनेमा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची महत्वाकांशी योजना मुंबई २४ तास. मुंबई नाईट लाईफचा नुकताच शुभारंभ झाला आहे. २७ जानेवारी पासून मुंबईत प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरू करण्यात आली आहे. यात मॉल्स, सिनेमगृह इत्यादी रात्रभर खुले असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असणारा आणि अक्षय कुमार, कटरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असणारा 'सूर्यवंशी' हा सिनेमा मुंबईच्या नाईट लाईफमध्ये रिलीज होणारा पहिला सिनेमा असणार आहे.

मोठी बातमी - मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सरकारवर केला 'हा' गंभीर आरोप..

अक्षय कुमार, कटरिना कैफ, रणवीर सिंग,अजय देवगण अशी प्रमुख स्टारकास्ट असलेला सूर्यवंशी हा सिनेमा येत्या २४ मार्चला प्रदर्शित होणार आहे. नाईट लाईफमध्ये आता सगळे सिनेमागृहसुद्धा सुरु असणार आहेत. नेहमीच्या धावपळीच्या आयुष्यात सामान्य मुंबईकरांना सिनेमा बघण्यासाठी वेळ काढता येत नाही. वेळ काढलाच तर सिनेमा बघण्यासाठी सिनेमाची तिकिटं देखील मिळत नाहीत. या सर्व गोष्टींमुळे मुंबईकर हैराण असतात. मात्र आता नाईट लाईफमुळे सिनेमागृह २४ तासांसाठी कुळी राहणार आहेत. तसंच सिनेमागृहांमद्धे 'शो'ची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे या आणि यानंतरच्या सर्व  चित्रपटांना चांगलाच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळण्याची चिन्हं आहेत.

मोठी बातमी - मुली आणि महिलांना आकर्षित करतात 'हे' गेम्स...

विशेष म्हणजे बाकी सर्व चित्रपटांसारखं  सूर्यवंशी चित्रपटाचं  'फ्रायडे रिलीज' नसणार आहे. सामन्यात: प्रेक्षकांची गर्दी होण्यासाठी शुक्रवारी चित्रपट रिलीज करण्याची पद्धत आही. मात्र सूर्यवंशी हा चित्रपट मंगळवारी प्रदर्शित होणार आहे. यावर्षी २५ मार्चला गुढीपाडवा आहे त्यामुळे सुट्टीच्या दिवशी पेक्षकांची गर्दी व्हावी आणि लॉन्ग विकेंड व्हावा यासाठी हा सिनेमा २४ मार्चला रिलीज होणार आहे.
 
रोहित शेट्टीच्या 'सिम्बा'चित्रपटात अक्षयनं 'सूर्यवंशी' चित्रपटाची घोषणा केली होती. रणवीर सिंहच्या 'सिम्बा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता या तीन सुपरस्टार्सचा हा सिनेमा प्रेक्षकांना किती आवडतो आणि मुंबईच्या नाईट लाईफमुळे चित्रपटाला आणि निर्मात्यांना अतिरिक्त किती फायदा होतो हे बघावं लागणार आहे.          

this movie will be first that will release in mumbai night life 

loading image