अशी वेळ कुणावरही येऊ नये ! स्वतःच्या रुग्णालयातही व्हेंटिलेटर मिळाला नाही आणि शेवटी..

अशी वेळ कुणावरही येऊ नये ! स्वतःच्या रुग्णालयातही व्हेंटिलेटर मिळाला नाही आणि शेवटी..

मुंबई : मुलुंडच्या एम टी अग्रवाल रुग्णालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली. कामावर असतानाच अचानक तब्येत खराब झाल्याने त्यांना त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवणे गरजेचे होते. रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने त्यांना कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आलं, मात्र तिथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात निदर्शन करत निषेध नोंदवला.

विजय कुलकर्णी असे या 48 वर्षीय कर्मचाऱ्यांचे नाव होते. लॉकडाऊन काळात रुग्णालयाला आपल्या सेवेची गरज आहे म्हणून कुलकर्णी  वाशिंद वरून दररोज मोटार सायकलने मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात कामावर हजर राहत होते. स्वता वॉर्ड बॉय असले तरी रुग्णालयात गरजेनुसार त्यांची ड्युटी लावली जात होती, मात्र त्यांनी कधी ही कोणत्याही प्रकारच्या कामाला नकार दिला नाही. कर्तव्यदक्ष तसेच परोपकारी वृत्तीमुळे कुलकर्णी सगळ्यांच्या मदतीला धावत असत.

शनिवारी रुग्णालयात कामावर असतांनाच कुलकर्णी यांनी ताप भरून आला. अचानक तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयातील आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. कुलकर्णी याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र एम टी अग्रवाल रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी आयसीयूची व्यवस्था नसल्याने त्यांना नायर रुग्णालयात नेण्याचा निर्णय झाला. मात्र तेथे आयसीयू उपलब्ध नसल्याने त्यांना मुलुंडमधील कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांचा दोन दिवसांनी मृत्यू झाला.

रूग्णालयातील आपला कर्मचारी काम करता करता अचानक गेल्याने कामगार वर्ग संतापला आहे. एम टी अग्रवाल रुग्णालयात जर का आयसीयू किंवा व्हेंटिलेटर ची व्यवस्था असती तर कुलकर्णी यांचे प्राण वाचले असते असे कर्मचाऱ्यांना वाटते. कुलकर्णी यांना स्वताच्या रुग्णालयातच चांगले उपचार का मिळाले नाहीत असा सवाल कर्मचारी करत आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणाने कुलकर्णी याचा बळी घेतला असल्याचा आरोप कामगार करत आहेत.

एम टी अग्रवाल रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात कामगार संघटनांनी काम बंद आंदोलन केले. रुग्णालय प्रशासनाकडे केवळ 4 व्हेंटिलेटर आहेत मात्र ते सर्व बंद असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला. कर्मचारी जीव मुठीत घेऊन आपले कर्तव्य बजावत असतांना रुग्णालय प्रशासनाकडून मात्र कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असणारी मास्क,सॅनिटायझर, पीपीई किट किंवा रोग प्रतिबंधात्मक औषध पुरवली जात नसल्याचा आरोप ही देशपांडे यांनी केला. कर्मचाऱ्यांना ताबडतोड सुरक्षा उपकरणे पूरवावीत तसेच व्हेंटिलेटर आठवाद्यायच्या आत सुरू करावेत अशी मागणी करत अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा देशपांडे यांनी दिला.

एम टी अग्रवाल रुग्णालय नॉन कोव्हीड असल्याने विजय कुलकर्णी यांना नायर रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय झाला,मात्र तिथे आयसीयू उपलब्ध नसल्याने त्यांना मुलुंडच्या कोव्हीड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एम टी अग्रवाल रुग्णालयाचे मुख्य अधिकारी विक्रांत तिकोने यांनी यावर भाष्य केलाय. रुग्णालयात चार व्हेंटिलेटर सुरू आहेत, जे नवीन व्हेंटिलेटर आहेत ते आठवड्याभरात सुरू करणार आहोत. रुग्णालयात आवश्यक सुरक्षा उपकरणे उपलब्ध असून कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येत आहेत. रुग्णालय प्रशासन कर्मचाऱ्यांची योग्य ती काळजी घेत आहे, असं ते म्हणालेत  

( संपादन - सुमित बागुल )

hospital health worker in mulund lost his life due non availability of ventilators  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com