
डोंबिवली: उच्च शिक्षित तरुण नशेबाज मित्रांच्या आहारी गेला आणि त्याने सारेच गमावले. कॅफे बंद झाला, दागिने गहाण ठेवले पैशांची चणचण भासू लागली आणि गांजा तस्करीकडे वळला. भुवनेश्वर एक्सप्रेस मधून प्रवास करत असताना गस्तीवरील रेल्वे प्रवाशांच्या तावडीत तो सापडला आणि हातात बेड्या पडल्या.