मीरा रोडच्या हॉटेल मध्ये मद्यधुंद होऊन तरुण तरुणीचा भर रस्त्यावर धिंगाणा

कायदा सुव्यवस्था चे धिंडवडे
hotel of Mira Road drunken young women youth rampaging on road social media mumbai police
hotel of Mira Road drunken young women youth rampaging on road social media mumbai policesakal

नालासोपारा :- मीरा रोड च्या एका हॉटेल मध्ये मद्यधुंद होऊन तरुण तरुणीचा भर रस्त्यावर धिंगाणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ ने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हद्दीतील कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे उडविले आहेत. मिरारोड पूर्व गौरव वुडस फेस टू, युनिक गार्डन्स, गौरव सिटी या उच्यब्रू सोसायटी परिसरातील लुडो लॉंच या हॉटेल समोरील मुख्य रस्त्यावरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. मात्र एवढे खुलले आम मद्यधुंद तरुण तरुणीचा नंगानाच चालू असतानाही संबंधित पोलीस प्रशासन एवढे शांत का? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये मद्यधुंद अवस्थेत दोन तरुण आणि दोन तरुणी वाद विवाद करत असून या वादात एक तरुणी अक्षरशा निर्वस्त्र झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर लुडो लॉंच या हॉटेल बाहेर काही नागरिक ही दिसत आहेत. मात्र सर्वजण फक्त तमाशा पाहत असल्याचे त्या व्हिडिओ वरून समोर आले आहे. मिरारोड पूर्व गौरव वुडस फेस टू, युनिक गार्डन्स, गौरव सिटी या उच्यब्रू सोसायटी परिसरातील लुडो लॉंच हे हॉटेल आहे. हा परिसर रहिवासी इमारतीचा असून, येथील राहिवाशाणी अनेकवेळा पोलिसांना तक्रारी पण त्यांच्याकडून कोणतीही कारवाही होत नसल्याचा आरोप स्थानिक राहिवाष्णी केला आहे.

दिल्लीतील निर्भय, श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला, महिला सुरक्षा साठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली, पण आजही मिरारोड सारख्या परिसरात मद्यधुंद अवस्थेत तरुण तरुणी भर रस्त्यावर खुळलेआम धीगांना घालत असतानाही पोलीस कोणतीच कारवाही करत नसल्याने पुन्हा एकदा एकाद्या मोठ्या घटनेची वाट पोलीस पाहत आहेत की काय असा प्रश्न व्हायरल झालेल्या व्हिडिओ ने समोर आली आहे.लुडो लॉंच या हॉटेल मधून बाहेर निघालेले तरुण तरुणी मद्यधुंद अवस्थेत असतात, रस्त्यावर बसतात, मध्यरात्री 2 ते 4 वाजेपर्यंत त्यांचा धीगाना सुरू असतो, आमच्या मुलांनाही आम्ही बाहेर घेऊन निघू शकत नाही. हे सर्व चित्र पाहून आमच्या लहान मुलांना काय दाखवतोय असा प्रश्न आमच्यासमोर पडतोय, त्यामुळे पोलिसांनी या अशा अश्लील प्रकारावर तात्काळ कारवाही करावी अशी मागणी मीनाक्षी तोष्णीवाल, महेश भुरके यांच्यासह अन्य स्थानिक रहिवाशी यांनी केली आहे.

लुडो लॉंच या हॉटेल ला रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी आहे. जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातील निर्वास्थ झालेला व्यक्ती हा तृतीयपंथी आहे. याबाबत आमच्याकडे कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल नाही

- जयवंत बाजबळे पोलीस उपायुक्त परिमंडळ मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय

आमच्या हॉटेल ला रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी आहे. हॉटेल मध्ये फॅमिली ही येत असते, येणाऱ्या गेस्ट ची आम्ही सर्व काळजी घेतो, पण बाहेर कोण काय करते याला आम्ही जबाबदार नाही. आमच्या हॉटेल मध्ये जर काही अनुचित प्रकार घडला तर ती जबाबदारी आमची आहे. शनिवारी जो प्रकार घडला तो चुकीच्या पद्धतीने व्हायरल होत आहे. त्यातील तरुणी नसून तृतीयपंथी आहे

-गिरीश राठोड हिशोबनिष लुडो लॉंच हॉटेल मिरारोड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com