
पनवेल : कळंबोलीतील सुधागड एज्युकेशन शाळेलगतच्या मोकळ्या जागेमध्ये हातगाडीवर बॉम्ब ठेवल्याची घटना समोर आली होती. या घटनेतील आरोपींनी पनवेलमधील नेवाळी टेंभोडे येथे भाड्याचे घर घेऊन तेथे बॉम्ब तयार केला होता. घर मालकाने आरोपींना घर भाड्याने देताना त्यांची कुठल्याही प्रकारची माहिती स्थानिक पोलिसांना दिली नसल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे खांदेश्वर पोलिसांनी घर मालक देवनाथ लक्ष्मण काथारा याच्याविरोधात कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : अकराशे रुपये आणि पाच वर्ष तुरुंगवास
बॉम्ब प्रकरणातील आरोपी दीपक दांडेकर, मनीष भगत आणि सुशील साठे या तिघांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी पनवेलच्या नेवाळे टेंभोडे येथील रूम नं. 4 भाड्याने घेतला होता. त्यानंतर दीपक दांडेकर याने बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू जमवून तीन महिन्यांत टाईम बॉम्ब तयार केला होता. त्यानंतर या आरोपींनी दांडेकरच्या कारमधून सुमारे 45 किलो वजनाच्या बॉक्ससह बनवलेला टाइम बॉम्ब कळंबोलीतील सुधागड शाळेलगत हातगाडीवर नेऊन ठेवला. दुसऱ्या दिवशी हातगाडीवर बॉम्ब सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दीपक दांडेकर, मनीष भगत व सुशील साठे या तिघांना अटक केली होती.
भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्या
घरमालकाने आपले घर भाड्याने देताना भाडेकरूंची संपूर्ण माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला कळवण्याबाबतचे पोलिस आयुक्तांचे आदेश आहेत; मात्र असे असतानाही अनेक घरमालकांकडून भाडोत्रींची माहिती पोलिसांना कळवण्यात येत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे घरमालकांनी आपल्या भाडोत्रींची माहिती स्थानिक पोलिसांना कळवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे; अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, चाळ मालक देवनाथ काथारा याने बॉम्ब प्रकरणातील आरोपींना खोली. नं. 4 भाड्याने देताना त्यांच्याशी करण्यात आलेला भाडेकरार तसेच भाडेकरू नोंदणी फॉर्म सादर करण्यासंबंधी लेखी समजपत्र दिले होते; मात्र चाळ मालक काथारा याने त्याबाबत कोणतेही कागदपत्र सादर केले नाहीत. यावरून चाळ मालक देवनाथ काथारा याने सदर आरोपी भाडोत्रींची माहिती स्थानिक पोलिसांना कळविली नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी त्याच्या विरोधात कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
WebTitle : house owner under arrest for not sharing information about tenet
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.