
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई: अल्लाहला माहित होते कोरोना येणार आहे. म्हणून मुंब्य्रात कब्रस्थान झाले असल्याचे धक्कादायक विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेच्या कार्यालयाच्या उदघाटन सोहळयात त्यांनी केलेले हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वक्तव्यामुळे भविष्यात आव्हाड अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाने वादंग निर्माण झाला आहे. 2011 मध्येच अल्लाहला माहित होते कोरोना कधी येणार आणि त्यानंतर 2020 मध्ये कोरोना महामारी आली. म्हणूनच 2019 मध्ये आपल्याला कब्रस्थान मिळाले असल्याचे आव्हाड बोलत असल्याची क्लिप व्हायरल झाली आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुंब्रावासियांची कब्रस्थानची मागणी ही अनेक वर्षांनंतर पूर्ण झाल्याचे अपयश झाकण्यासाठी मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी अल्लाहचा सहारा घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे मुस्लिम समाजाला खूश करण्याच्या नादात केलेले हे विधान अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा- अखेर उद्या गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांच्या हाती
-------------------
(संपादन- पूजा विचारे)
Housing Minister Jitendra Awhad shocking statement in mumbra thane