अखेर उद्या गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांच्या हाती

अखेर उद्या गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांच्या हाती

मुंबई: मुंबई पोलिस गॅंगस्टर रवी पुजारीचा ताबा सोमवारी घेणार आहेत.  मुंबई पोलिसांच्या मागणीनंतर स्थानिक न्यायालयाने त्याच्या ताबा देण्याबाबतचा निर्णय दिला आहे. दीड वर्षांपूर्वी पुजारीच भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. यापूर्वी नोव्हेंबरमध्येही पुजारीचा 10 दिवसांचा ताबा देण्यास स्थानिक न्यायालयाने होकार दिला होता. पण त्यानंतर पुजारीने या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

2016 च्या गजाली हॉटेलमधील गोळीबाराप्रकरणीअटक करण्यात आले आहे.  खंडणी विरोधी पथकाला त्याचा ताबा मिळणार आहे. रवी पुजारी याच्या विरोधात मुंबईत 49 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 26 गुन्हे "मोक्का' अंतर्गत आहेत. त्यामुळे त्याला लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी होते. ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर बाबीमध्ये अडकून पडले. पुजारी सध्या कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात आहे. बंगळूरुत 39, मंगलोरमध्ये 36, उडुपीत 11, म्हैसूर-हुबळी-धारवाड-कोलार-शिवमोगा येथे प्रत्येकी एक गुन्हा पुजारीच्या विरोधात दाखल आहे.

पुजारीच्या विरोधात गुजरातमध्येही सुमारे 75 गुन्हे दाखल आहेत. मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुन्हेगारी विश्‍वातील हालचालींची तातडीने माहिती घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी रवी पुजारी याच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे होई शकतील. मुंबईत दाखल गुन्ह्यांप्रकरणी त्याचा ताबा घेण्यात घेण्यासाठी सोमवारी कायदेशीर बाबी पूर्ण करून त्याचा ताबा घेण्यात येणार आहे.

रवी पुजारीने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनाही धमकावले होते. 2017-18 मध्ये अनेकांनी त्याच्याकडून धमकीचे फोन येत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या. 2009 ते 2013 दरम्यान पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन यांना धमकावल्याचे सांगण्यात येते.

तांत्रिक मुद्यामुळे मुंबई पोलिसांना ताबा मिळवण्यास अडचण आली होती. 2015 च्या एका प्रकरणामध्ये पुजारीची दहा दिवसांची कोठडी मुंबई पोलिसांना मिळण्याबाबत कर्नाटक न्यायालयाने निर्णय दिला होता. पण सेनेगल कोर्टाने फक्त कर्नाटकातील प्रकरणांमध्ये पुजारीचा ताबा दिला असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर सेनेगलमध्ये मुंबई पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने अर्ज करून परवानगी मिळवली होती.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai police get custody of gangster Ravi Pujari monday

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com