मुंबईत कसा असेल 5.0 लॉकडाऊन? संध्याकाळी होणार महत्वपूर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

31 मे रोजी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपणार होता. त्यातच शनिवारी केंद्र सरकारनं लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची घोषणा केली. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या पाचव्या टप्प्यातील नियमावलीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळपर्यंत मुंबईतील लॉकडाऊन संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुंबई शहर रेड झोनमध्ये आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देशासह राज्यात लॉकडाऊन आहे. 31 मे रोजी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपणार होता. त्यातच शनिवारी केंद्र सरकारनं लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची घोषणा केली. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या पाचव्या टप्प्यातील नियमावलीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळपर्यंत मुंबईतील लॉकडाऊन संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आज संध्याकाळपर्यंत लॉकडाऊन 5.0 विषयी राज्य सरकार मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने दिलेल्या नियमांनुसार मुंबईतील लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी राज्य सरकार तयार नाही आहे. कारण, मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊनचं पालन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

नक्की वाचा : कोरोना वॉर्डातून मिळाला डिशचार्ज, घरी आलेत आणि अवघ्या चार तासात....

आता दोनच झोन असणार 

पूर्वी लॉकडाऊनच्या 4 टप्प्यात रेड झोन, ऑरेंन्ज झोन, तसंच ग्रीन झोन, नॉन रेड झोन असे झोन होते. मात्र 5.0 मध्ये कंटेन्मेंट झोन आणि नॉन कंटेन्मेंट झोन असे दोनच कलर कोडिंग असणार आहेत. जो भाग कंटेन्मेंट झोन असेल तिथे कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात येणार नसल्याचं सांगण्यात येतं आहे. 8 जूननंतर कंटेन्मेंट झोनशिवाय इतर ठिकाणी सर्व मंदिर, मॉल, शॉप्स खुले होतील. राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती विचार लक्षात घेत शाळा कॉलेज याचा विचार करावा अथवा पुन्हा जून अखेर आढावा घेऊन जुलै महिन्यात सुरू करावे, असे निर्देश देण्यात आलेत. पण महाराष्ट्र सरकार याबाबत काय निर्णय घेतं हे पाहणंही महत्त्वाचं आहे.दुसरीकडे राज्यात नॉन-कंटेन्मेंट झोन वगळता लॉकडाऊनमध्ये कोणताही बदल होणार नसल्याची दाट शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये जिल्ह्यांच्या सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

सर्वात मोठी बातमी - कोरोना रुग्णांना उपचार देण्याबाबत झाला 'मोठा' निर्णय...

शरद पवार - उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा 

केंद्र सरकारनं लॉकडाऊनबाबतचा निर्णय जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरू झाली. या बैठकीत लॉकडाऊन 5 संदर्भात महत्वाची चर्चा झाली. कंटेन्मेंट झोन वगळता लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याची मुभा केंद्रानं राज्य सरकारकडे सोपवली आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातला कोरोनाबाधितांचा वाढता आलेख पाहता लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत मुख्यमंत्री जास्त इच्छुक नसल्याचं समजतंय. तर राज्यात लॉकडाऊनमध्ये टप्पाटप्प्याने सूट देण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही माहिती समोर आली आहे. 

शरद पवार यांनी याआधी मुंबईतील लोकल ट्रेन सुरू करण्याच्या बाजूने मत मांडलं होतं. त्यानंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न व्हावा यासाठी लॉकडाऊनमध्ये जास्तीत जास्त शिथिलता आणली गेली पाहिजे, अशी राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांची भूमिका आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेंकासोबत शनिवारी रात्री वर्षा निवासस्थानी चर्चा केली.

How about 5.0 lockdown in Mumbai? Important decisions will be made in the evening


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How about 5.0 lockdown in Mumbai? Important decisions will be made in the evening