कोरोना वॉर्डातून मिळाला डिशचार्ज, घरी आलेत आणि अवघ्या चार तासात....

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

मुंबईत कोरोनाग्रस्त पोलिस कोरोनातून बरे होत आहेत तर त्यांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढत चाललं आहे. मात्र नवी मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 

मुंबई: मुंबईत कोरोनाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ३६ हजारांजच्या पार पोहोचला आहे. आता कोरोना योद्ध्यांनाही कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त पोलिस कोरोनातून बरे होत आहेत तर त्यांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढत चाललं आहे. मात्र नवी मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या तब्बल २,३२५ वर पोहोचली आहे तर आतापर्यंत राज्यात २६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मात्र मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनाबाधित पोलिसाला यशसवी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं, त्यांचं टाळ्या वाजवून स्वागतही करण्यात आलं. मात्र त्यानंतर अवघ्या ४ तासांमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय.

हेही वाचा: खासगी डॉक्टर्सना देखील मिळणार 'हे' संरक्षण, आता तरी खासगी डॉक्टर्स सेवा देणार का ?

'दीपक हाटे' असं या पोलिस कर्मचाऱ्यांचं नाव आहे ते वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. अडकलेल्या मजुरांना गावी पाठवण्यासाठी ज्या पोलिसांची ड्युटी होती त्यामध्ये दीपक हाटे यांचाही समावेश होता. यानंतर काहीच दिवसात दीपक हाटे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दीपक हाटे आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना वरळीतल्या राष्ट्रीय क्रीडा अकादमी कोव्हिड सेंटरमध्ये हलवण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले होते. 

१ किलोमीटर पायी आले: 

उपचारांनंतर दीपक हाटे यांना त्यांच्या घरापासून तब्बल १ किलोमीटरच्या अंतरावर सोडलं. तिथून ते घरापर्यंत पायी आले असं परिसरातल्या नागरिकांनी सांगितलंय. ते आल्यानंतर स्थानिकांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. त्यानंतर ते आपल्या घरी गेले. मात्र मध्य रात्री एकच्या सुमारास त्यांना परत श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तातडीनं रुग्णवाहिकेनं त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. 

हेही वाचा: रिलायन्सने बनवले चीनपेक्षा स्वस्त पीपीई किट..किंमत आहे फक्त इतकी .. 

काय म्हणाले डॉक्टर: 

"रुग्णाला लक्षणं नसतील तर त्याला दहा दिवसांनी कोरोना चाचणीशिवाय डिस्चार्ज दिला जातो. त्यानुसार दीपक हाटे यांची नाडी  तपासणी करून आणि तापमान मोजून त्यांना डिशचार्ज देण्यात आला. आम्ही बेस्ट बसचं नियोजन केलं होतं मात्र त्यांना स्वत:च्या बाईकनं घरी जायचं होतं” असं डॉक्टरांनी म्हंटलंय. दरम्यान आणखी एका योध्याचा अशाप्रकारे मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे.

police who discharged from corona died after hours read full story read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police who discharged from corona died after hours read full story read full story