esakal | 'मुख्यमंत्र्यांचा भाजपा द्वेष किती मोठा'? अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली न वाहिल्याने मुख्यमंत्र्यांवर भाजपचे टीकास्त्र
sakal

बोलून बातमी शोधा

'मुख्यमंत्र्यांचा भाजपा द्वेष किती मोठा'? अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली न वाहिल्याने मुख्यमंत्र्यांवर भाजपचे टीकास्त्र

काल भाजपचे दिवंगत नेते, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली न वाहिल्याने राज्यातील भाजपनेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला आहे. 

'मुख्यमंत्र्यांचा भाजपा द्वेष किती मोठा'? अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली न वाहिल्याने मुख्यमंत्र्यांवर भाजपचे टीकास्त्र

sakal_logo
By
migrator

मुंबई - राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. अन् तेव्हापासूनच भारतीय जनता पक्षाच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे हे आहेत. काल भाजपचे दिवंगत नेते, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली न वाहिल्याने राज्यातील भाजपनेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते, माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची काल  ( 25 डिसेंबर ) रोजी जयंती होती. विरोधी पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. परंतु शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली न वाहिल्याने राज्यातील भाजप नेते ठाकरे यांच्यावर टीका करीत आहेत. भाजपनेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आणि म्हटले की, ' काल श्रध्येय अटलजींच्या जयंती दिनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली नाही. मुख्यमंत्र्यांचा भाजपा द्वेष किती मोठा आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली. चेहऱ्यावर सतत उसनं हसू आणून हा विद्वेष लपवता येईल का? '

भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले आहे. त्यांनीदेखील ट्विट करीत म्हटले की,  ' भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे विस्मरण काल मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना झाले. सत्तेसाठी अशा अनेक गोष्टी सोईस्करपणे विस्मृतीत टाकल्या जात आहेत. असो. अटलजींच्या शब्दात सांगायचे तर छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. ' 

How big is the BJPs hatred of the Chief Minister? BJPs criticism of Chief Minister for not paying tribute to Atal Bihari Vajpayee

----------------------------------------------------------------------

loading image
go to top