लहान मुलांना "कोरोना'ची माहिती कशी देणार? वाचा युनीसेफच्या टिप्स 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोना संकटाबद्दल लहान मुलांना भिती न दाखवता परिस्थिती समजून सांगणे गरजेचे आहे. मुलांना कशा प्रकारे हे समजून सांगावे याबद्दल युनीसेफचे संवाद तज्ञ जेकब हंट, यांनी दिलेल्या या काही सूचना

"कोरोना'मुळे जग हादरले आहे. संपुर्ण जग लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल करत आहे. सर्व अंगणवाड्या, शाळा बंद झाल्या आहेत. त्यामुळे मुले घरी आहेत. मात्र, लहान मुलांना "कोरोना'च्या संकटाबद्दल अंदाज येणे कठिण आहे. त्यामुळे मुले घरी बसून चिडचीड करतात, अस्वस्थ होतात. त्यामुळे तूम्ही मुलांसोबत संवाद साधणे गरजेचे आहे. त्यांना कोरोना संकटाबद्दल भिती न दाखवता परिस्थिती समजून सांगणे गरजेचे आहे. मुलांना कशा प्रकारे हे समजून सांगावे याबद्दल युनीसेफचे संवाद तज्ञ जेकब हंट, यांनी दिलेल्या या काही सूचना 

COVID19 : कोरोनाबाबत नसत्या अफवा पसरावणाऱ्यांच्या तोंडावर मारा 'ही' बातमी

1)मुलांना प्रश्न विचारा आणि त्यांना ऐकूण घ्या 
मुलांना बोलतं करा. मुलांना कोरोनाबद्दल नक्की कितपत माहिती आहे. याचा अंदाज पालकांना येईल. कोरोनाबद्दल मुलांना भिती न दाखवता. स्वच्छतेच्या चांगल्या सवयीबद्दल त्यांना सांगा, आठवण करुन द्या. मुलांना मनमोकळेपणाने बोलू द्या. काही गोष्टी, वेगळे विषय काढून त्यांच्याशी संवाद साधा 
मुलांनी उपस्थित केलेले प्रश्न, त्यांना वाटणारी चिंता याकडे दुर्लक्ष करु नका. त्यांच्या मनात काय चालले आहे ते समजून घ्या. या काळात भिती वाटणे स्वाभाविक आहे याची जाणीव मुलांना करुन द्या. आणि तूमचं त्यांच्याकडे पुर्ण लक्ष आहे, त्यांना तूम्ही लक्षपुर्वक ऐकत आहात, याची जाणीव वेळोवेळी करुन द्या. 

2) मुलांशी प्रामाणिक रहा- मित्र बनून सत्य सांगा 
जगामध्ये काय चाललय त्याची सत्य परिस्थिती जाणून घ्यायचा मुलांनाही अधिकार आहे. मात्र त्रासापासून दूर ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.लहान मुलांना कळेल या भाषेत बोला. त्यांच्या हावभावावर लक्ष ठेवा. त्यांना त्रास होत असेल तर संवेदनशील राहा. 
आंतराष्ट्रीय संघटना युनीसेफ, वर्ल्ड हेल्थ संघटना यांच्या वेबसाईट कोरोनासंदर्भातील माहितीचा मोठा स्त्रोत्र आहे. त्यामुळे तज्ञांच्या माहितीवर विश्वास ठेवण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरा. 

3) स्वतःला आणि मित्रांना कसे सुरक्षित ठेवावे हे दाखवून द्या 
कोरोना विषाणूशी संरक्षण करण्यासाठी मुलांना दररोज हात स्वच्छ धुण्यासाठी प्रवृत्त करा. त्यासाठी मुलांना नाहक भिती दाखवण्याची गरज नाही. त्यापेक्षा गाण गाऊन, डान्स, हलक्‍याफुलक्‍या विनोदाच्या माध्यमातून स्वच्छतेबद्दल पटवून दिलं तर उत्तमच 
खोकतांना तोंड कस झाकायचे ही कृतीसह त्यांना सांगा. ज्यांना हे लक्षण हे, त्याच्या जवळ जाऊ नका. सातत्यानं मुलांना ताप, सर्दी, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत आहे का हे विचारत रहा 

'वर्क फ्रॉम होम'च्या काळात असा बूस्ट करा तुमच्या WiFi इंटरनेटचा स्पीड...

4) मुलांना सुरक्षेची खात्री द्या 
ऑनलाईन, टीव्हीवर कोरोनासंदर्भातील भंयकर दृष्य बघतांना, कुणालाही खूप मोठ संकट आपल्या घरी आले आहे. हे लक्षात येऊ शकते. मात्र, लहान मुलांना टीव्हीवरची भीषण दृष्य आणि त्यांच्यासमोरील खरी परिस्थिती यातील अंतर कळत नसते. अशा वेळी ते घाबरतात. या तणावातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मदत करा. खेळण्यासाठी, मजा करण्याची आणि आरामाची ही संधी हे त्यांना समजून सांगा. 
तूमच्या भागात विषाणू बाधित रुग्ण आढळले आढल्यास, त्यामुळे तूम्ही बाधित होणार नाही याची जाणीव करुन . तूमची काळजी घेण्यासाठी संपुर्ण कुंटुब सज्ज आहे याची जाणीव त्यांना करुन द्या. 

5) मुलांच्या मनावर होणाऱ्या परिणामाबद्दल जागरुक रहा 
कोरोना विषाणूमुळे जगभरात खूप वाईट, असंवेदनशिल घटना घडल्या आहेत. या घटनांचा तूमच्या मुलावर काही परिणाम तर झाला नाही ना. याची सातत्याने चौकशी करत रहा. 
कोरोना संसर्ग काही विशिष्ट लोकांशी संबधित नाही. तो कुठल्या भागाशी, भाषेशी संबधित नाही. त्यापेक्षा सर्वांची मदत कशी करायला पाहीजे याबद्दल त्यांना सांगा 

6) मदत करणाऱ्यांबद्दल सांगा 
या कठिण समयी लोक एकमेकांना कशा प्रकारे मदत करत आहेत. त्याबद्दल मुलांना सांगा. कोरोना संकटाशी झुंजणारे डॉक्‍टर, वैज्ञानिक , तरुण मुल कशी मदत करत आहेत या गोष्टी त्यांना सांगा. 

7) स्वतःची काळजी घ्या 
लहान मुल मोठ्यांचे अनुकरण करतात, त्यामुळे तूम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात. हे पालकांना कृतीद्वारे मुलांना पटवून द्याव लागणार आहे. जर तुम्ही अस्वस्थ असाल तर स्वतःला सावरण्यासाठी थोडा वेळ घ्या. या काळात पालक शांत, संयमी असणे गरजेचे आहे. 

8) काळजी घ्या, मात्र संवाद ठेवा 
मुलांसोबत संवाद साधल्यानंतर त्यांच्या देहबोलीवरून, आवाजातल्या चढउतारावरुन, श्वासावरुन त्यांची शारीरीक परिस्थिती कशी आहे. त्यांच्या मनात काय चालले आहे ते समजून घ्या. मुलांसाठी, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी तूम्ही कायम उपलब्ध आहात. याची जाणीव वांरवार करुन द्या 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to inform kids about "Corona"