निगरगठ्ठ आणि सुस्त यंत्रणेचे आणखी किती बळी? 108 रुग्णवाहिका आणि ऑक्सिजनअभावी एकाचा मृ्त्यू

निगरगठ्ठ आणि सुस्त यंत्रणेचे आणखी किती बळी? 108 रुग्णवाहिका आणि ऑक्सिजनअभावी एकाचा मृ्त्यू
Updated on

पाली - सुधागड तालुक्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. 108 रुग्णवाहिका बंद असल्याने आणि ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने मंगळवारी (ता.25) पालीतील एका 57 वर्षीय रुग्णाला हकनाक आपला प्राण गमवावा लागला.

पालीतील समर्थ नगरमधील एका 57 वर्षीय रुग्णास कोव्हिडची लागण झाल्यामुळे श्वासोत्सवास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यांना ताबडतोब पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तिथे गेल्यावर त्यांना ऑक्सिजन न लावता व ऑक्सिजन पातळी तपासणी करून अधिक उपचारासाठी लागलीच रोहा येथे नेण्यास सांगितले. मात्र रुग्णाला नेण्यासाठी 108 नंबर रुग्णवाहिका बंद होती. मागील 6-7 दिवसांपासून इंजिनमध्ये बिघाड असल्याने ही रुग्णवाहिका बंद आहे. तसेच ऑक्सिजन नसलेली दुसरी कुठलीही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. अखेर त्यांना त्यांच्या खाजगी गाडीमधून ऑक्सिजन शिवाय रोहा येथे रुग्णालयात न्यावे लागले. आणि तिथे गेल्यानंतर त्यांची प्राणज्योत मावळली असे प्रत्यक्षदर्शी कपिल पाटील यांनी 'सकाळ'ला सांगितले.

टाळाटाळ
     मृत व्यक्ती 2 वेळा वावळोली येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी गेले होते. तिथे त्यांना लक्षणे नाहीत असे सांगून आणि कोविडची तपासणी करायची असल्यास रोहा किंवा अलिबागलाजा असे सांगण्यात आले. 

केवळ रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन नसल्याने या रुग्णाचा जीव गेला आहे. लागलीच उपचार आणि रुग्णवाहिका मिळाली असती तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. केवळ आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे हे झाले आहे.
कपिल पाटील,
प्रत्यक्षदर्शी

108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याने ती काही दिवसांपासून बंद आहे. 102 क्रमांकाची रुग्णवाहिका महिलांच्या प्रसूतीसाठी वापरली जाते. आवश्यकता असल्यास कोलाड व रोह्यावरून रुग्णवाहिका मागवतो. तिथे उपलब्ध असल्यास रुग्णवाहिका मिळते. तसेच महाड येथे इमारत दुर्घटना झाल्यामुळे जिल्ह्यातील काही रुग्णवाहिका तिथे देखिल गेल्या आहेत. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन उपलब्ध आहे मात्र ते प्रवासासाठी (ट्रान्सपोर्टेशन) वापरले जात नाही.
डॉ. शशिकांत मढवी,
तालुका वैद्यकीय अधिकारी

108 रुग्णवाहिका बंद असली तरी 3 कंपन्यांमधील  रुग्णवाहिका सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातील एका रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची व्यवस्था आहे. तसेच 108 रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव देखील पाठवला आहे. लोकांनी थोडीजरी कोव्हिडची लक्षणे आढळल्यास घरी न बसता ताबडतोब सरकारी दवाखान्यात जावे.
दिलीप रायण्णावार,
तहसीलदार, पाली-सुधागड

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com