कोरोना लसीकरणासाठी कशी सज्ज आहे मुंबई, कुणाच्या वाट्याला किती डोसेस

सुमित बागुल
Saturday, 16 January 2021

मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला. अशात आता मुंबई लसीकरणासाठी पूर्णतः सज्ज झाली आहे. 

मुंबई : आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात होतेय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी या लसीकरण मोहिमेचं उदघाटन करतील आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात लसीकरण मोहिमेला सुरवात होणार आहे.  महाराष्ट्रात देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील लसीकरण मोहिमेचा श्रीगणेशा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमात मुंबईतील कूपर रुग्णालयाला थेट मोदींशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान आजपासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी मुंबई कशी सज्ज आहे जाणून घेऊयात... 

मुंबईतील एकूण नऊ रुग्णांलयांमध्ये लसीकरण केंद्रांवर ही लस दिली जाणार आहे. मुंबईतील नऊ केंद्रांवर लसीकरणासाठी एकूण ७२ बूथ असणार आहेत. या सर्व लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी पाच बूथसाठी एक डॉक्टर देखील असणार आहेत. एका बुथवर दोन शिफ्टमध्ये दोनशे आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यातील लसीकरणात लस दिली जाणार आहे. मुंबईत दररोज १४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची मुंबईतील आरोग्य विभागाची क्षमता आहे. 

महत्त्वाची बातमी : आज कोरोना लसीकरणाचा शुभारंभ; राज्यात 285 लसीकरण केंद्रांवर तयारी पूर्ण 
 

कोणत्या जिल्ह्याला किती डोस मिळाले : 

 • मुंबई : १ लाख ३९ हजार ५००
 • पुणे : १ लाख १३ हजार 
 • औरंगाबाद : ३४ हजार 
 • बीड : १८ हजार 
 • बुलडाणा : १९ हजार 
 • अमरावती : १७ हजार 
 • भंडारा: ९ हजार ५०० 
 • जळगाव : २४ हजार  
 • धुळे, नंदुरबार :प्रत्येकी १२ हजार ५०० डोस 
 • गडचिरोली : १२ हजार 
 • गोंदिया : १० हजार 
 • परभणी : ९ हजार 
 • नागपूर : ४२ हजार 
 • नाशिक : ४३ हजार 
 • अहमदनगर : ३९ हजार 
 • सांगली : ३२ हजार 
 • सातारा : ३० हजार 
 • कोल्हापूर : ३७ हजार 
 • रायगड : ९ हजार ५०० 
 • रत्नागिरी : १६ हजार 
 • सिंधुदुर्ग : १० हजार 
 • भंडारा : ९ हजार ५००
 • चंद्रपूर : २० हजार 
 • वाशीम : ६ हजार ५०० 
 • ठाणे : ७४ हजार 
 • पालघर : १९ हजार 
 • सोलापूर  : ३४ हजार 
 • जालना : १४ हजार 
 • उस्मानाबाद : १० हजार 
 • वर्धा : २० हजार ५००
 • यवतमाळ : १८ हजार 
 • लातूर : २१ हजार 

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Marathi news from mumbai

देशभरात मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळाला. अशात आता मुंबई लसीकरणासाठी पूर्णतः सज्ज झाली आहे. 

how mumbai is set to give covid vaccine to mumbaikar a to z information


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how mumbai is set to give covid 19 vaccine to mumbaikar a to z information