esakal | BMC च्या कार्यक्रमांचं तुम्हाला निमंत्रण नसतं का? महापौरांनी दिलं उत्तर

बोलून बातमी शोधा

kishori-pednekar.jpg
मुंबईच्या महापौरांनाच BMC कार्यक्रमाचं निमंत्रण नसतं का?
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही व्हायरसची मोठ्या प्रमाणात बाधा झाली आहे. त्यामुळे महापालिकेकडून लवकरच लहान मुलांसाठी नवीन कोरोना वॉर्डची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर (Mumbai mayor)किशोरी पेडणेकर (kishori pednekar)यांनी दिली. विरोधी पक्षात असलेल्या भाजपावर सुद्धा त्यांनी टीका केली. भाजपाने आंदोलन करण्यापेक्षा लस उपलब्ध करुन देण्यावर लक्ष द्यावं, असं महापौर म्हणाल्या. मुंबईत आजपासून दादरच्या कोहिनूर पार्कमध्ये ड्राइव्ह इन लसीकरण सुरु झालं आहे. देशातील हा असा पहिलाच प्रयोग आहे. पण मुंबईच्या महापौरांना याबद्दल काहीही माहित नाहीय. (Mumbai mayor kishori pednekar gave information about covid preparation)

रस्त्यावर राहणारे बेघरांचे लसीकरण कसे करणार? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, "जैन मुनी साधू यांच्याकडे आधार कार्डचं नाहीय. जे बेघर आहेत, ज्यांचा ठावठिकाणा नाही, अशांच काय करणार? जे काही अवधीसाठी आले, त्यांच्याकडे कोणातही पुरावा नाही, अशा तीन-चार घटकांचा विचार होणं गरजेचं आहे. महापालिका या घटकांचं लसीकरण कसं करता येईल, याचा विचार करतेय."

हेही वाचा: मुंबई: व्हेंटिलेटर्स रूग्णालयात पडून; डॉक्टर्सना प्रशिक्षणच नाही...

पत्रकारांनी किशोरी पेडणेकर यांना महापालिकेच्या कार्यक्रमाना त्यांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारला. काल महापालिकेचा एक कार्यक्रम झाला, त्याला तुम्ही उपस्थित नव्हता. तुम्हाला निमंत्रण देण्यात आलं होतं का? की, निमंत्रणच नव्हतं? असा प्रश्न विचारला.

हेही वाचा: चांगली बातमी! मुंबईत रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ

"महापालिकेकडून असं वारंवार घडतय. अतिरिक्त आयुक्तांना वेळ नाहीय. ते कळवत नाहीत. त्यामुळे मी तिथे पोहोचू शकत नाही. जिथे कळवलं जातं, तिथे मी उपस्थित राहते. मला समजलं तर मी तिथे पोहोचते. आमंत्रणाची वाट पाहत नाही" असं उत्तर किशोरी पेडणेकर यांनी दिलं.