INSIDE STOY : शोध, चाचणी, विलगीकरण, धारावी पॅटर्नची त्रिसूत्री...

INSIDE STOY : शोध, चाचणी, विलगीकरण, धारावी पॅटर्नची त्रिसूत्री...

मुंबई : 1 एप्रिल रोजी धारावीत पहिला कोरोना रुग्ण आढळला. त्यानंतर मे महिन्यापर्यंत कोरोनाचे रुग्ण वाढतच होते. मात्र, जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून कोरोनाचे रुग्ण घटू लागले आहे. देशातील सर्वाधिक दाट वस्ती असलेल्या धारावातील कोरोनावर नियंत्रण मिळवणे प्रशासकीय यंत्रणांपुढील आव्हानच होते. पण, शोध, चाचणी आणि विलगीकरण या त्रिसुत्रीच्या आधारावर महापालिकेने स्थानिक डॉक्‍टर आणि स्थानिक सामाजिक संस्थांच्या मदतीने कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. धारावीत एप्रिलमध्ये असलेला रुग्णवाढीचा दर 12 टक्क्यांवरुन 14 जून पर्यंत 1.05 टक्क्यांवर आला आहे. तर मृत्यूदर 5 टक्क्यांवरुन 3.7 टक्क्यांवर आला आहे. 

1 एप्रिल रोजी धारावीच्या बालिगानगरमध्ये पहिला कोविड बाधित रुग्ण आढळला. त्यानंतर 48 तासात परीसर सिल करणे, संशयीत व्यक्ती, हायरीस्क व्यक्ती शोधून त्यांचे विलगीकरण करणे, चाचण्या करणे. परीसराचे निर्जुंतुकरण करणे, परीसर सिल केल्यानंतर जिवानावश्‍यक वस्तुंचा नियमीत पुरवठ्याची यंत्रणा उभारणे अशी कामे करण्यात आली. हे 48 तासांचे सुत्र पुढे प्रत्येक ठिकाणी राबवण्यास सुरवात केली. त्यानंतर 7 एप्रिल पासून या परीसरात एकही रुग्ण आढळला नाही. धारावीतील झोपडीत पहिला रुग्ण 4 एप्रिल रोजी सापडला. त्यानंतर पालिकेन रुग्ण सापडण्याची प्रतिक्षा न करता स्वत: मैदानात उतरून संशयीत व्यक्ती शोधण्यास सुरवात केली. त्यात 5 लाखाहून अधिक व्यक्तींची चाचणी करण्यता आली.

काय आहे धारावी

  • 2.5 लाख चौरस मिटरचा परीसर
  • 8.5 लाखाहून अधिक स्थायिक आणि स्थालांतरीत लोकसंख्या
  • 2 लाख 27 हजार नागरीक प्रत्येक चौरस किलोमिटरला

धारावीत रहिवाशी आणि स्थालांतरीत कामगार मिळून 8 ते 8 लाख 50 हजारहून अधिक लोकवस्ती आहे. त्यातील 5 लाखाहून अधिक नागरीकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर काही खासगी डॉक्‍टरांनीही नागरीकांच्या चाचण्या केल्या. त्यामुळे हा आकडा 6 लाखाहून अधिक होतो.

या सर्वांची तपासणी केल्यानंतर त्यातील संशयीत म्हणून साधारण 7 हजार नागरीकांची कोविड चाचणी करण्यात आली. यापैकी 2013 आता पर्यंत कोविड रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण पालिकेकडे येण्यापुर्वी यातील जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पालिका स्वत: पोहचली होती.

खासगी डॉक्‍टरांची मदत

महापालिकेला खासगी डॉक्‍टरांचीही या कामात मदत झाली. घराघरा जाऊन खासगी डॉक्‍टरांनी 47 हजार 400 रहिवाशांची तपासणी केली. तर, मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून 14 हजार 970 नागरीकांची तपासणी करण्यात आली होती. खासदार राहूल शेवाळे यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनच्या मदतीने डॉक्‍टरांनी घरा घरात जाऊन नागरीकांची तपासणी केली होती.

आकड्यांचे खेळ

  • 450 - स्वच्छतागृहांचे नियमीत र्निर्जंतुकीकरण
  • 9 - विलगीकरण केंद्र
  • 3840 - विलगीकरणाची व्यक्तींचे क्षमता
  • 8540 - विलगीकरण केंद्रात आता पर्यंत दाखल व्यक्ती
  • 5 खासगी रुग्णालये कोविडसाठी राखीव

6 लाखाहून अधिक नागरीकांची तपासणी

पालिकेच्या वैद्यकिय पथकाने 4 लाख 76 हजार 775 नागरीकांची घराघरात जाऊन तपासणी केली. तर, पालिकेच्या जेष्ट नागरीक सर्वेक्षणात 8 हजार 246 नागरीकांची तपासणी करण्यात आली. पालिकेच्या दवाखान्यात 879 नागरीकांची तापसणी केली. पालिका आणि खासगी डॉक्‍टरांनी मिळून या भागातील 5 लाख 48 हजार हून अधिक नागरीकांची नोंदणीकृत तपासणी केली. तर, काही ठिकाणी खासगी डॉक्‍टरांनी वैयक्तीक तपासणी केली असून त्यामुळे हा आकडा 6 लाखहून अधिक होतो.

मुंबई महापालिकेचे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणतात, धारावीत सामाजिक अंतर राखणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे नागरीकांची प्राथमिक तपासणी करुन त्यांची चाचणी करण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर संशयीत रुग्ण हायरीस्क व्यक्ती यांचे विलगीकरण करण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर रुग्ण आढळलेल्या ठिकाणचं निर्जंतुकरण करणे, सार्वजनिक शौचालयांचे निजंर्तुकिरण करणे याला प्राधान्य देण्यात आले. एखादा परीसर सिल केल्यावर तेथे जिवानावश्‍यक वस्तुंचा तुटवडा होणारा नाही याचीही दक्षता घेण्यात येत होती. वेळीच कोविडबाधित व्यक्ती शोधल्या जात असल्याने त्यांच्यावर वेगाने उपचार सुरु करण्यात येत होते. त्यामुळे रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण वाढणे आणि मृत्यू दर कमी करणे शक्‍य झाले.

धारावी

एप्रिल

  • सापडलेले रुग्ण - 491
  • वाढीचा सरासरी दर -12 टक्के
  • रुग्ण दुप्पट होण्यचा कालावधी -18 दिवस
  • कोविडवर मात करणारे रुग्ण -33 टक्के
  • मृत्यू दर - 5 टक्के

मे

  • सापडलेले रुग्ण -1216
  • वाढीचा सरासरी दर -4.3 टक्के
  • रुग्ण दुप्पट होण्याचा दर -43 दिवस
  • कोविडवर मात करणारे रुग्ण -43 टक्के
  • मृत्यू दर -4 टक्के

14 जून पर्यंत

  • सापडलेले रुग्ण - 274
  • सरासरी वाढीचा दर - 1.05 टक्के
  • रुग्ण दुप्पट होण्याचा दर - 80 दिवस
  • कोविडवर मातर करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण - 49 टक्के
  • मृत्यू -3.7 टक्के

46 हजार नागरीकांचे विलगीकरण

धारावीतील हायरीस्क आणि लो रिस्क मिळून 46 हजार नागरीकांचे विलगीकरण करण्यात आले. म्हणजे साधारण 1 रुग्ण आढळल्यावर 6 हून अधिक नागरीकांचे विलगीकरण केले जात होते. साधारण 10 हजार 412 हायरीस्क व्यक्ती नोंदविण्यात आल्या होत्या. तर, 8 हजार 540 नागरीकांचे पालिकेच्या केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले. तर, 38 हजार 34 जणांचे घरी विलगीकरण करण्यात आले. विलगीकरण केंद्रातही वैद्यकिय पथक तैनात होते. त्या नागरीकांच्या प्रकृतीचा रोजच्या रोज आढावा घेतला जात होता.

देशात पहिल्यांदाच खासगी रुग्णालय ताब्यात

मे महिन्यांच्या दुसऱ्या आठवड्यानंतर खासगी रुग्णालय ताब्यात घेण्याची चर्चा सुरु झाली. मात्र, धारावीत खासगी रुग्णालयात ताब्यात घेऊन तेथे कोविड रुग्णांवर उपचार करण्यास देशात पहिल्यांदा सुरवात झाली. सध्या धारावी परीसरातील 5 रुग्ण कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तेथे 55 वर्षाखालील तसेच गंभिर नसलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येतात. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयांवरील ताण कमी झाला. त्याचबरोबर खासगी डॉक्‍टरांना पीपीई किट देऊन त्यांचे दवाखाने सुरू करण्यात आले. हा प्रयोगही देशात पहिल्यांदा धारावीत झाला.

how one of the biggest slums in asia dharavi successfully coming out of corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com