वाचलो ! तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत आपल्यावरचं किती मोठं COVID19 चं संकट टळलंय

वाचलो ! तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत आपल्यावरचं किती मोठं COVID19 चं संकट टळलंय

मुंबई : कोरोनाची दहशत दिवसेंदिवस देशात वाढत चालली आहे. आतापर्यंत देशात कोरोनाचे २००० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यात दिल्लीमध्ये तबलिगी जमातीच्या मरकज या कार्यक्रमात लाखो सहभागी झाल्यामुळे या लोकांची शोधाशोध सुरु झाली आहे. मुंबईच्या वसईमध्येही तबलिगी जमातचा मरकज हा कार्यक्रम होणार होता. मात्र राज्य सरकारनं या कार्यक्रमाला ६ मार्चला परवानगी नाकारली आणि राज्यावरचं मोठं संकट टाळलं आहे.

जानेवारी महिन्यात तबलिगी जमातच्या मरकज या कार्यक्रमाला पालघरच्या पोलिस अधीक्षकांनी परवनागली दिली होती. मात्र त्यानंतर जगात वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता. कोकणचे आयजी निकेत कौशिक यांनी पालघरच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी या कार्यक्रमाला किती लोकं येणार आहेत आणि कुठून येणारआहेत याची माहिती घेतली. या कार्यक्रमांना परदेशातूनही काही लोकं सहभागी होणार आहेत असं समजल्यानंतर त्यांनी तातडीनं ही माहिती गृहमंत्र्यांना दिली.

त्यावेळी जगात कोरोनाचा कहर बघता गृहविभाग अलर्ट झाला. त्यानंतर या कार्यक्रमाबाबत मुख्यंमत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात बैठक झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या कार्यक्रमाला तातडीनं परवानगी नाकारण्यात आली.

हा कार्यक्रम १४ मार्चला वसईत होणार होता. मात्र महाराष्ट्र सरकारनं परवानगी नाकारल्यानंतर हा कार्यक्रम दिल्लीत घेण्यात आला. या कार्यक्रमात तब्बल ३-४ हजार लोकं सहभागी होते. मात्र जर हा कार्यक्रम मुंबईत झाला असता तर या कार्यक्रमाला तब्बल ८-१० हजार लोकांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात होती.

जर मुंबईत हा कार्यक्रम झाला असता तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनानं हाहाकार माजवला असता. मात्र राज्य सरकारच्या समय सूचकतेमुळे हा मोठा नार्थ टळला असाच म्हणावं लागेल.

how quick action on intelligence information saved maharashtra big time from covid 19 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com