समोरच्याला समजू न देता असे वाचा #WhatsApp वरचे मेसेज...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

मुंबई: WhataApp वर आपण सर्वजण नेहमीच आपल्या मित्र-मैत्रिणींशी, नातेवाईकांशी चॅटिंग करतो. दिवसातले अनेक तास आपण Whatsapp वर घालवत असतो. WhatApp  देखील आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. मात्र Whatsapp वर असेही काही फीचर्स आहेत ज्यामुळे तुम्ही कोणतेही लपून छपून मेसेजेस वाचू शकता. तुम्ही कोणाचा मेसेज वाचला तर त्यांना ते कळू शकणार नाही. 

मुंबई: WhataApp वर आपण सर्वजण नेहमीच आपल्या मित्र-मैत्रिणींशी, नातेवाईकांशी चॅटिंग करतो. दिवसातले अनेक तास आपण Whatsapp वर घालवत असतो. WhatApp  देखील आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. मात्र Whatsapp वर असेही काही फीचर्स आहेत ज्यामुळे तुम्ही कोणतेही लपून छपून मेसेजेस वाचू शकता. तुम्ही कोणाचा मेसेज वाचला तर त्यांना ते कळू शकणार नाही. 

WhatsApp वर तुम्ही कोणालाही मेसेज पाठवता तेंव्हा दोन टिक येतात. जेंव्हा त्यांना मेसेज पोहोचतो तेंव्हा २ टिक तुम्हाला दिसतात आणि त्यांनी मेसेज वाचला की त्या टिक निळ्या होतात. मात्र आपल्या Contact मध्ये असेही काही लोकं असतात ज्यांचे मेसेजेस आपल्याला वाचायचे असतात मात्र याबद्दल त्यांना कळू द्यायचं नसतं. आता तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. Whatsapp चं हे फिचर अनोखं आहे.  

हेही वाचा: ४०० शाळांतील पालकांचा हात कपाळाला...

काय आहे हे फीचर: 

Whatsapp च्या सेटिंग्समध्ये 'रीड रिसीट' नावाचं ऑप्शन देण्यात आलं आहे. या रीड रिसीट ला 'ऑफ' करून तुम्ही कोणाला न कळू देता त्यांचे मेसेजेस वाचू शकता. रीड रिसीट ऑफ केल्यामुळे तुम्ही मेसेज वाचल्यानंतरही त्या दोन टिक निळ्या होणार नाहिये. त्यामुळे तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचला आहे एवढंच मसेज पाठवणाऱ्यांना समजू शकणार आहे. मात्र तुम्ही तो मेसेज वाचला की नाही वाचला हे हे कळू शकणार नाही. मात्र रीड रिसीट ऑफ केल्यावर तुम्ही पाठवलेला मेसेज कोणी वाचला आहे की नाही हे तुम्हालाही कळू शकणार नाहीये. 

आपल्या मोबाइलचं असंही एक फीचर आहे ज्यामुळे whatsappला न जाता तुम्ही आलेले मेसेजेस बघू शकता आणि वाचू शकता. ज्यामुळे तुम्ही 'ऑनलाईन' न जाता मेसेजेस वाचू शकता. तुम्हाला मेसेजेस पाठवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ऑनलाइन आहात हे ही दिसणार नाही. यासाठी तुम्हाला पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे. 

हेही वाचा: ठाण्यात तापमानवाढीबरोबर हवाही प्रदूषित 

  • Whatsapp चे नोटिफिकेशन ऑन करा 
  • तुम्हाला Whatsapp वर मेसेज येऊ द्या 
  • मेसेज आल्यावर मोबाईल अनलॉक करा मात्र नोटिफिकेशन बारमधून Whatsapp चे नोटिफिकेशन स्वाइप करू नका. 
  • नोटिफिकेशन बार खाली ओढून Whatsapp वर क्लिक करा 
  • त्यानंतर तुम्ही ऑनलाईन न जाता Whatsapp वरचे मेसेजेस वाचू शकणार आहात. 

हे फीचर्स तुम्ही अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात. त्यामुळे आता तुम्ही दुसऱ्यांचे मेसेजस लपून छपून वाचू शकणार आहात.  

How to read Whatsapp messages secretly read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to read Whatsapp messages secretly read full story