esakal | ठाण्यात तापमानवाढीबरोबर हवाही प्रदूषित 
sakal

बोलून बातमी शोधा

Temperature rise in Thane

ठाणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवत असला, तरी दिवसा शहरातील तापमानवाढीला सुरुवात झाल्याची प्रचीती येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा ठाणेकरांना सोसाव्या लागत आहेत. तापमानवाढीमुळे शहरातील प्रदूषणाची टक्केवारीही वाढल्याचे पालिकेच्या संकेतस्थळावरील हवेच्या निर्देशांकावरून स्पष्ट होत आहे. शहरातील हवेच्या निर्देशांकांने 100 ओलांडली असून 105.33 टक्‍क्‍यांवर निर्देशांक गेला आहे. 

ठाण्यात तापमानवाढीबरोबर हवाही प्रदूषित 

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

ठाणे : ठाणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवत असला, तरी दिवसा शहरातील तापमानवाढीला सुरुवात झाल्याची प्रचीती येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा ठाणेकरांना सोसाव्या लागत आहेत. तापमानवाढीमुळे शहरातील प्रदूषणाची टक्केवारीही वाढल्याचे पालिकेच्या संकेतस्थळावरील हवेच्या निर्देशांकावरून स्पष्ट होत आहे. शहरातील हवेच्या निर्देशांकांने 100 ओलांडली असून 105.33 टक्‍क्‍यांवर निर्देशांक गेला आहे. 

भिवंडीत एमआयएमची सभा रद्द

गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या वेळी उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. शहराचे कमाल तापमान गुरुवारी 36 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा वाढलेला पारा पाहता मार्च, एप्रिल, मे महिन्यात अधिक तीव्र असेल, अशी शक्‍यताही हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. कमाल आणि किमान तापमानाबरोबर हवेतील आर्द्रतेतही वाढ होत आहे.

ठाणे शहरात दिवसाला सरासरी किमान तापमान 22.8; तर कमाल तापमान 36.4 अंश सेल्सिअस नोंदवले जाते. तर हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही 23 टक्के असते. शहरात विविध विकासकामांमुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. परिणामी शहरातील तापमानातही वाढ होत असल्याचे पालिकेच्या संकेतस्थळावरील नोंदीवरून स्पष्ट होते. 

म्हणून तीने कोर्टात जाऊन वकिलाला केली मारहाण

तापमानवाढीसोबतच प्रदूषित हवेचाही सामना ठाणेकरांना करावा लागत आहे. पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाच्या वतीने पालिका क्षेत्रातील चार ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजली जाते. त्यामध्ये तीनहात नाका, कोपरी प्रभाग समिती, नौपाडा प्रभाग समिती व औद्योगिक विभागाचा समावेश आहे. या चारही भागातील हवेची गुणवत्ता पाहता अतिशय प्रदूषित अशीच नोंद पालिकेच्या संकेतस्थळावर आढळून येते. 

हवेतील सल्फरडाय ऑक्‍साईड आणि नायट्रोजन ऑक्‍साईडचे प्रमाण योग्य प्रमाणात असले तरी सूक्ष्म धूलिकणांमध्ये वाढ झाल्याने शहरातील हवा प्रदूषित झाली आहे. हवेतील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण 197.2 टक्के इतके नोंदविले गेले आहे; तर सल्फरडाय ऑक्‍साईडचे प्रमाण 24.75 टक्के; तर नायट्रोजन ऑक्‍साईडचे प्रमाण 70.28 टक्के इतके नोंदविले गेले असून हवेती गुणवत्ता 105.33 टक्के आहे. एपीआय रिपोर्टनुसार 75 टक्‍क्‍यांच्या वर प्रमाण गेल्यास हवेची गुणवत्ता ही अतिशय प्रदूषित म्हणून गणली जाते. 

विभागानुसार हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी 
तीनहात नाका विभाग : 171.31 टक्के 
कोपरी प्रभाग समिती : 75.83 टक्के 
नौपाडा प्रभाग समिती : 91.67 टक्के 
औद्योगिक विभाग : 82.5 टक्के