esakal | कसा रोखणार कोरोनाला? ना तोंडावर मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; नवी मुंबई फेरीवाल्यांकडून नियमांची पायमल्ली
sakal

बोलून बातमी शोधा

कसा रोखणार कोरोनाला? ना तोंडावर मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; नवी मुंबई फेरीवाल्यांकडून नियमांची पायमल्ली

कोरोनामुळे लागू असलेल्या टाळेबंदीच्या काळात शहरातील रस्ते आणि पदपथावरून गायब झालेले फेरीवाले पुन्हा एकदा अवतरले आहे.

कसा रोखणार कोरोनाला? ना तोंडावर मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; नवी मुंबई फेरीवाल्यांकडून नियमांची पायमल्ली

sakal_logo
By
सुजित गायकवाड

नवी मुंबई : कोरोनामुळे लागू असलेल्या टाळेबंदीच्या काळात शहरातील रस्ते आणि पदपथावरून गायब झालेले फेरीवाले पुन्हा एकदा अवतरले आहे. वाशी, ऐरोली, घणसोली, नेरूळ, बेलापूर आदी भागांतील रस्ते आणि पदपथावर हे फेरीवाले पुन्हा बिनधास्तपणे बसण्यास सुरुवात झाली आहे. तोंडावर मास्क नाही की सोशल डिस्टन्सिंग नाही. तसेच सार्वजनिक जागेत थुंकणे, अशी नियमबाह्य कृत्य घडत असल्याने पुन्हा एकदा कोरोनाला उघड आमंत्रण दिले जात आहे. 

मुंबईकरांनो खबरदार! मास्क नसेल तर भरावा लागणार दंड; BMC ची कारवाई सोमवारपासून सुरू

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून राज्य सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली. हळूहळू संचारबंदीचे रूपांतर टाळेबंदीत झाले. टाळेबंदीच्या काळात रस्ते आणि पदपथावरील, तसेच सार्वजनिक ठिकाणी फेरीवाल्यांवर बंदी घातली गेली. उघड्यावरील अन्नपदार्थ तयार करण्यावरही प्रतिबंध आला होता. भाजीपाला, कांदे-बटाटे आदी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी प्रशासनातर्फे काही ठराविक फेरीवाल्यांना परवानगी दिली होती. गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे, यासाठी शहरी वसाहतींजवळील मोकळी मैदाने फेरीवाल्यांना दिली होती. त्याव्यतिरीक्त इतर ठिकाणी बसण्यास मज्जाव केला होता.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था, आयडॉलच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; 'असे' असणार परिक्षेचे स्वरूप

आता शहरात मिशन बिगेन अगेननुसार अनलॉक लागू केल्यामुळे सर्वत्र दुकाने सुरू झाली आहेत. प्रशासनाने फेरीवाल्यांवरील पकड ढील केल्यामुळे ते पुन्हा प्रकट झाले आहेत. वाशी रेल्वेस्थानक परिसर, वाशी सेक्टर 9, नेरूळ रेल्वेस्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भाग, शिरवणे गाव, घणसोली गावाजवळ, ऐरोली वसाहती, बेलापूर सेक्टर 4 या ठिकाणी फेरीवाले बसण्यास सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी फेरीवाले बसत आहेत, त्या ठिकाणी कारवाई होत नसल्याने तोंडावर मास्क लावलेले नसतात. दिसेल तिकडे थुंकले जात आहे. खरेदी करताना ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जात आहे. या सर्व परिस्थितीमुळे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )