H5N1 Bird Flu पासून स्वतःला दूर ठेवण्याचे गोल्डन रुल्स जाणून घ्या

सुमित बागुल
Monday, 11 January 2021

WHO च्या एका अहवालानुसार हा रोग इन्फ्लुएंजा टाइप H5N1 व्हायरसमुळं पसरतो.

मुंबई : महाराष्ट्रात परभणीत तब्बल ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू झालाय. देशभरात एकीकडे कोरोनाचं संकट तर आहेच. सोबतच आता बर्ड फ्लू डोकं वर काढतोय. अशात नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येतंय. हिमाचल, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशात देखील बर्ड फ्लू पसरला आहे. महाराष्ट्रातील बर्ड फ्लू मुळे झालेल्या ८०० कोंबड्यांमुळे आता महाराष्ट्रात आपल्या सर्वांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. 

धक्कादायक : Bird Flu हा आजार पक्षांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरू शकतो.  WHO च्या एका अहवालानुसार हा रोग इन्फ्लुएंजा टाइप H5N1 व्हायरसमुळं पसरतो. धक्कादायक बाब म्हणजे या आजाराचा मृत्युदर हा तब्बल साठ टक्के इतका जास्त आहे. पक्षांची विष्ठा किंवा लाळेमधून हा व्हायरस तब्बल दहा दिवसांपर्यंत पसरू शकतो. 

महत्त्वाची बातमी मुंबईतील तीन रुग्णांमध्ये E484K या नवीन कोरोना व्हायरसची लक्षणे; ब्रिटननंतर आता दक्षिण आफ्रिकेतील नवीन व्हायरसचे मुंबईत 

कशी घ्याल काळजी :

  • देशभरात आपण एकीकडे कोरोनाशी लढत असताना आता बर्ड फ्लूचं संकट घोंगावतंय. अशात स्वच्छतेची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
  • स्वतःबाबतची स्वच्छता सोबतच आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
  • बर्ड फ्लू हा पक्षांमुळे पसरतो, त्यामुळे आपल्या आसपास पक्षांचा मोठ्या प्रमाणात वावर असेल तर अधिकची स्वच्छता गरजेची आहे.
  • आपल्या घराच्या खिडक्या, छत, जाळ्या जंतुनाशकांनी नीट साफ करा.
  • कबुतरांना दाणे टाकणे बंद करा
  • बाहेरून तुम्ही चिकन आणत असलात तर चिकन आणताना देखील काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
  • हातात ग्लोव्स आणि तोंडावर मास्क घालून चिकन आणायला जा.
  • कोरोनाची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे सोशल डिस्टंसिंग पाळायलाच हवं. 
  • चिकनच्या दुकानात किंवा कत्तलखात्यात काम करणाऱ्याला हाय रिस्क म्हणून पाहिलं जाऊ शकतं. त्यामुळे अशा माणसांपासून सुरक्षित अंतर ठेऊन व्यवहार करा.  

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

चिकन आणि अंडी खाताना काय काळजी घ्याल :

सरकारकडून चिकन आणि अंडी न खाण्याबाबत अधिकृत काहीही माहिती आलेली नाही. त्यामुळे सर्वात आधी अवफवांवर विश्वास ठेवणे बंद करा. चिकन आणि अंडी खाताना ते योग्य प्रकारे शिजवून खा. केवळ चिकन आणि अंडीच नाही तर सर्व मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवून खाणे गरजेचे आहे. चिकनला किमान 100 डिग्री तापमानावर शिजवा आणि त्यानंतरच त्याचे सेवन करा. 

how to take care during bird flu and what precautions are necessary amid bird flu


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to take care during bird flu and what precautions are necessary amid bird flu