INSIDE STORY : बेवारस कारमुळे तपास पोहोचला मेमन कुटुंबियांपर्यंत, युसुफच्या घराचा वापर दहशवादी कृत्यासाठी

INSIDE STORY : बेवारस कारमुळे तपास पोहोचला मेमन कुटुंबियांपर्यंत, युसुफच्या घराचा वापर दहशवादी कृत्यासाठी

मुंबई : मुंबईतील 1993 च्या साखळी स्फोटातील मुख्य आरोपी टायगर मेमन याचा भाऊ युसुफ मेमन याचा नाशिक कारागृहात हृदय विकाराच्या झटक्यामुळे शुक्रवारी मृत्यू झाला. मुंबई स्फोटांनंतर वरळी येथे बेवारस सापडलेल्या व्हॅनमुळे हा तपास मेमन कुटुंबियांपर्यंत पोहचला होता. त्यात पुढे मेमन कुटुंबातील अनेक सदस्यांना अटक झाली होती. दहशतवादी कृत्यासाठी घराचा वापर करण्यास देणा-या युसुफ मेमनचाही त्यात समावेश होता. याप्रकरणी युसुफला विशेष टाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

मुंबईतील 1993 च्या साखळी स्फोटांमध्ये शिवसेनेच्या तत्कालीन नगरसेवकांच्या हत्येचाही कट आखण्यात आला होता. त्यासाठी मुंबई महानगरपालिका कार्यालयाजवळील शिवसेना कार्यालयात गोळीबार करण्यात येणार होता. त्यासाठी  शेख अली, शेख उमर, मोहम्मद उस्मान अहमद जान खान, जावेद दाऊद टेलर ऊर्फ जावेद चिकना, खान बशीर अहमद हक खान ऊर्फ बशीर इलेक्ट्रिशियन व नाशीर अहमद, अन्वर शेख ऊर्फ बबलू यांची निवड करण्यात आली होत.

मारुती व्हॅनमधून एके 56 रायफल, हातबॉम्ब, पिस्तूल आदी शस्त्रांसह टायगर मेमनच्या माहीम येथील अल हुसेनी इमारतीमधून सीएसएमची रेल्वे स्थानकाच्या दिशेने रवानाही झाले. पण सेंच्युरी बाजार येथे पासपोर्ट कार्यालयाजवळ झालेला स्फोट रस्त्याच्या जवळच रस्त्याच्या दक्षिणेकडे जाणारी वाहिनी पूर्णपणे स्थब्ध झाली होती. काचांचा ढीग रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुक खोळंबली.

घडलेल्या स्फोटांमुळे सर्वत्र वाहतूक खोळंबली. स्फोटामुळे उडालेला हाहाकार व झालेल्या गर्दीमुळे कारमधील सर्वजण घाबरले. त्यांनी शस्त्रसाठ्यासह ती कार वरळी येथील सीमेन्स कंपनीजवळील रस्त्यावर उभी करून पळ काढला. तत्कालीन वरळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णू शिंदे व सध्या भायखळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक असलेले दिनेश कदम यांनी ती कार पाहिली. ती कार टायगर मेमनचा भाऊ सुलेमान मेमन याची पत्नी रुबीना हिच्या नावावर मारुती व्हॅन असल्याचे उघड झाले.  तेथूनच या प्रकरणाचे धागेदोरे मेमन कुटुंबियांपर्यंत पोहोचले. पुढे या घरातून मिळालेल्या चावी स्फोटात सापडलेल्या एका स्कूटरची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.

स्फोटानंतर टायगरने पलायन केले. पण युसुफच्या अल हुसेनी इमारतीतच या स्फोटाचा कट रचला गेला होता. पण अल हुसेनी या इमारतीतील फ्लॅट व गॅरेजचा वापर दहशवादी कृत्यासाठी करू दिल्यामुळे युसुफलाही याप्रकरणी अटक झाली. त्याला विशेष टाडा न्यायलायाने याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी त्याचा भाऊ याकुबला यापूर्वीच फाशी देण्यात आली आहे. या साखळी स्फाटात 257 निष्पाप नागरीकांचा बळी गेला होता. त्या काळी या स्फोमुळे 26 कोटी रुपायांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.

how yusuf memon was linked to mumbai terro attack read inside story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com