मोठी बातमी - नवी मुंबईत एक आठवडा पुन्हा एकदा कडकडीत लॉकडाऊन

मोठी बातमी - नवी मुंबईत एक आठवडा पुन्हा एकदा कडकडीत लॉकडाऊन

नवी मुंबई : शहरात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता पुन्हा एकदा लॉकडाऊन घेण्यात येणार आहे. 29 जून पासून शहरातील कन्टेन्मेंट झोनमध्ये सात दिवस हा लॉकडाऊनचा कालावधी असणार आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. 

नवी मुंबई शहरातील कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबई, ठाणे पाठोपाठ नवी मुंबई शहरातही कोरोनाबाधितांचा आकडा वाढता आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे प्रमाण जास्त असले तरी कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे सत्र थांबलेले नाही. त्यामुळे सरकारच्या नव्या नियमावलीनंतरही नवी मुंबईची रेड झोनमधून सुटका झालेली नाही. शहरातील वाढत्या रुग्णांच्या बाबतीत आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई पोलीस आयुक्तलयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासहीत इतर पोलीस व पालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शिंदे यांनी नोडनिहाय रुग्णांची तसेच पोलीस व महापालिका करीत असलेल्या उपाय-योजनांची माहिती जाणून घेतली. एपीएमसी मार्केट, महामार्गावरील वाहतूक व ट्रक टर्मिनल्समध्ये केलेले नियोजन जाणून घेतले. नवी मुंबई सद्य वाढलेले रुग्ण हे लॉकडाऊन अनलॉक केल्यानंतर वाढल्याचे प्रकर्षाणे दिसून येत असल्याचा अंदाज महापालिका व पोलिसांकडून वर्तवण्यात आला. त्यामुळे कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन घेण्याची गरज असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

त्यानुसार येत्या 29 जून पासून सात दिवसांचा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. महापालिकेने घोषीत केलेल्या कन्टेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन पाळला जाणार आहे. या काळात महापालिकेतर्फे सामाजिक संघटनांची मदत घेऊन कंटेन्मेंट झोन मधील रहिवाशांच्या घरोघरी जाऊन मास स्क्रीनिंग केले जाणार आहे. नागरिकांची लक्षणे जाऊन घेऊन स्वब टेस्ट केल्या जातील अशी माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली. 

या भागात असेल लॉकडाऊन

बेलापूर नोडमध्ये दिवाळे आणि करावे गाव, तुर्भेमध्ये तुर्भे स्टोअर्स, तुर्भे सेक्टर 21 आणि तुर्भे गाव, वाशी नोडमध्ये सेक्टर 11 जुहू गाव, कोपरखैरणे भागात खैरणे व बोनकोडे, सेक्टर 19, घणसोलीत रबाळे गाव आणि ऐरोलीत चिंचपाडा या भागात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

वाढता वाढता वाढे

नवी मुंबईत सद्यस्थितीत तब्बल 5 हजार 853 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी प्रकृती सुधारल्यामुळे 3 हजार 294 रुग्णांना घरी सोडून देण्यात आले आहे. तर 194 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे सद्या महापालिकेच्या आणि खाजगी विविध रुग्णालयात 2 हजार 356 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एकूण 224 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. 106 जणांना बरे झाल्यामुळे सोडण्यात आले तर 5 रुग्णांचा मृत्यु झाला.

strict lockdown will be observed in navi mumbai for one week

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com