"फणसाड'मधील ट्रॅप कॅमेरे लंपास 

मेघराज जाधव
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

वन संपदेवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेऱ्याची मोठी मदत होते. परंतु तिन्ही कॅमेऱ्यांची चोरी झाली आहे. याप्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तविरोधात कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुरूड : तालुक्‍यातील फणसाड अभयारण्यातील तीन ट्रॅप कॅमेऱ्यांची चोरी झाली आहे. या प्रकरणी अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी मुरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवताना आता वन विभागाला मोठी अडचण येणार आहे.

हे वाचा : गणेश नाईकांना धक्का  

फणसाड अभयारण्याचे क्षेत्रफळ 69.79 चौरस किलोमीटर आहे. मुरूड अणि रोह तालुक्‍यांत ते पसरलेले आहे. सुमारे 700 प्रकारचे वृक्ष, 17 प्रकारचे प्राणी आणि 90 हून अधिक जातीची रंगीत फुलपाखरे या क्षेत्रात आहेत. चिखलगाण, धरणगाण फणसाडगाण आदी 30 पाणस्थळे आहेत. त्यामुळे या संपदेवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेऱ्याची मोठी मदत होते. परंतु तिन्ही कॅमेऱ्यांची चोरी झाली आहे. याप्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तविरोधात कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुरूड ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एस. सी. लवटे हे अधिक तपास करीत आहेत. 

असा होतो कॅमेऱ्यांचा उपयोग 
फणसाड अभयारण्यातील वन्यजीवांची गणना आणि त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी 2014 मध्ये 3 ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले होते. आतापर्यंत त्यांच्या मदतीने वन विभागाला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या कॅमेऱ्यांची किमत 60 हजार रुपये आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hree trap cameras have been stolen in Phansad Sanctuary