गणेश नाईकांना धक्का; 'त्या' चार नगरसेवकांनी बांधलं शिवबंधन!

गणेश नाईकांना धक्का; 'त्या' चार नगरसेवकांनी बांधलं शिवबंधन!
गणेश नाईकांना धक्का; 'त्या' चार नगरसेवकांनी बांधलं शिवबंधन!

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेल्या गणेश नाईकांना मोठा धक्का बसला आहे. मागील आठवड्यात भाजपच्या ज्या चार कट्टर समर्थक नगसेवकांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. त्या चारही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या चारही नगरसेवकांनी शिवबंधन बांधलं आहे. सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्के, मुद्रिका गवळी असे या चार नगरसेवकांची नावे आहेत.

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना भाजपला गळती लागण्यास सुरूवात झालीये. राज्यात महाविकास आघाडीच्या यशस्वी प्रयोगानंतर नवी मुंबईतही हाच प्रयोग राबवला जाणार आहे. एप्रिल महिन्यात होत असलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणूकीत महाविकास आघाडी उतरणार आहे. सुरेश कुलकर्णी यांच्यासारखा तीन वेळा असलेले नगरसेवक तसेच त्यांनी निवडून आणलेले तीन असे एकूण चार नगरसेवकांमुळे भाजपला तुर्भे परिसरात भले मोठे खिंडार पडले आहे. 

कुलकर्णींच्या पावलावर पाऊल ठेवत तुर्भे, ऐरोली आणि सीबीडीतील पाच नगरसेवकांनी अलिकडच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत दिले आहेत. या नगरसेवकांकडूनही कोणत्याही क्षणी राजीनामा येण्याची दाट शक्‍यता पालिका वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे गेली अनेक दशके पालिकेवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या गणेश नाईक यांचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे. 

काही दिवसांपुर्वीच मिळाले होते संकेत
काही दिवसांपूर्वी तुर्भेमधील भाजपचे चार नगरसेवक शिवसनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली होती. सुरेश कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या भव्य हळदीकुंकू समारंभासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सुरेश कुलकर्णी यांचे कौतुक केले होते. तुर्भेतील झोडपट्टीला एस.आर.ए. लागू करण्याबाबत पावले उचलली जातील, असेही आश्वासनही शिंदे यांनी यावेळी दिले होते. त्यानंतर सुरेश कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्ची रंगली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com