मुंबई पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी दाखल झालेला ऋतिक तब्बल तीन तासांनी बाहेर

मुंबई पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी दाखल झालेला ऋतिक तब्बल तीन तासांनी बाहेर

मुंबई: अभिनेता ऋतिक रोशन याच्याजवळ तब्बल तीन तास मुंबई पोलिसांनी चौकशी केली.  बनावट ई-मेल आयडी प्रकरणात सायबर पोलिसांनी हा गुन्हा CIU पथकाकडे वर्ग केला होता.  2016 पासून हा गुन्हा सायबर पोलिसांकडे होता. याची चौकशी  मुंबईच्या सायबर पोलिसांनी 2020 डिसेंबर पर्यंत करण्यात आली. त्यानंतर ऋतिक वकील महेश जेठमलानी यांनी पोलिस आयुक्त परमबीर सिंह  यांच्या जवळ या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर हा गुन्हा मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सायबर पोलिसांकडून या पथकाकडे वर्ग केला. याच प्रकरणी ऋतिक रोशनला बोलावून आज या गुन्ह्यांची पोलिसांनी माहिती घेतली.

2016 मध्ये ऋतिकने बनावट ईमेल प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. डिसेंबर महिन्यात हे प्रकरण सायबर पोलिसांकडून गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता कक्षाकडे(सीआययू)  वर्ग करण्यात आले होते. त्यामुळे गुन्हे शाखा ऋतिकचा जबाब नव्याने नोंदवणार आहे.

अभिनेता ऋतिकचा घटस्फोट झाल्यावर (डिसेंबर,2013 मध्ये) त्याने पॅरिसमध्ये कंगनाला प्रपोज केले होते, असे कंगनाने 2016 मध्ये सांगितले होते. त्यासाठी ऋतिकच्यावतीने पासपोर्टची माहिती सादर करण्यात आली होती. कंगनाने 2014 मध्ये  ऋतिकला पाठवले ईमेल पुरावे म्हणून सादर केले होते.

2016 च्या सुरुवातीला, एका मुलाखतीत ऋतिकबद्दल बोलताना तिने हृतिकचा उल्लेख ‘पूर्वाश्रमीचा मुर्ख प्रियकर’ असा केला होता. तिच्या या वक्तव्यामुळे ऋतिकने, कंगनाला कायदेशीर नोटीस बजावली होती. कंगनाने माझी माफी मागावी असा संदेश त्याने या नोटीसमधून पाठवला होता. 2016 ची सुरुवात या वादाने झाली तर वर्षाचा शेवटही याच वादाने झाला होता. ऋतिकने त्याच्यासोबतचा कंगनाचा एक फोटो व्हायरल केला होता.

तसेच दोघांमधील ऑनलाईन संभाषण व्हायरल केले होते. त्यावर ऋतिक रोशनने आपल्या नावाने बनावट ईमेला पाठवलायाच दावा केला होता. त्याप्रकरणी ऋतिकच्या तक्रारीनंतर भादंवि कलम 419 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर पोलिस याप्रकरणी तपास करत होते. पण आता याबाबत सीआययू तपास करत आहे.

ऋतिकला मुंबईच्या पोलिसांनी समन्स बजावण्यात आलं होतं. 2016 मध्ये अभिनेत्याच्या नावाने बनावट ई-मेल आयडी उघडून त्याच्या फॅन्स आणि त्याच्या मित्रांची संवाद साधला जात होता. एका मित्राने आपल्या ई-मेल ला उत्तर का देत नाही हे विचारल्यानंतर ऋतिकला या बनावट ईमेल प्रकरणाची माहिती मिळाली. 

त्यानुसार त्याने सायबर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला.  4 डिसेंबर 2020 पर्यंत या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस करत होते. यादरम्यान तपास अधिकारी यांच्या अनेक बदल्या झाल्या, मात्र त्यात कोणताही निष्कर्ष पोलिसांनी काढला नाही. याच मेल द्वारे अभिनेत्री कंगना राणावत तिच्याशी देखील संवाद साधण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होतं.

Hrithik Roshan leave office of Mumbai Police Commissioner after three hours

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com