मुंबई : विद्यार्थ्यांना लसकवच! 28 दिवसांत लसीकरण पूर्णत्त्वाचे लक्ष्य

लहान मुलांच्या लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद
corona vaccination
corona vaccinationsakal media

मुंबई : कोरोना रुग्णसंख्या (corona patients) वाढत असताना देशात सोमवारपासून (3 जानेवारी) सुरु झालेल्या लहान मुलांच्या लसीकरणाला (child corona vaccination) उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले. यावेळेस लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकाला लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, मुंबईत पुढच्या 28 दिवसांत लसीकरण पूर्ण करण्याचा मानस असल्याचे पालिका प्रशासनाकडून (bmc) सांगण्यात आले आहे. (huge responce to children's corona vaccination bmc on vaccination completion target in 28 days)

corona vaccination
मुंबई उपनगरात 133 गुन्हे दाखल; 42 लाखांचा मुद्देमाल जप्त

लहान मुलांचं लसीकरण सुरु झाले आहे. संपूर्ण राज्यात या लसीकरणासाठी खास नियोजन करण्यात आले आहे. मुंबईतील बीकेसी जंबो कोविड केंद्रात विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. बीकेसी जंबो कोविड केंद्रातच 3 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेचे पर्यावरण मंत्री यांनी उद्गाटन केले. मुंबईतील बीकेसी जंबो कोविड केंद्रात विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.  

महापालिकेच्या मुलुंडमधील रिचर्डसन ॲण्ड क्रुडस जम्बो कोव्हिड सेंटरवर देखील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पालिकेतील शाळेतील मुलांना आज बसमध्ये आणत लसीकरण करण्यात आले. दिवसभरात बीकेसी कोविड केंद्रात 2 हजारांहून अधिक 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण केले गेले. पालिकेच्या शाळेतील मुलांसोबतच इतर मुलं देखील आपल्या पाल्यांसोबत येत लस घेत असल्याचं बघायला मिळालं. आज ह्या लसीकरण केंद्रावर 100 कोव्हॅक्सिन लसीचे डोस देण्यात येणार आहे.

corona vaccination
मोटारसायकल विक्रीच्या बहाण्याने पोलिसाला गंडा; गुन्हा दाखल

मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसारख्या मोठ्या शहरांसह पूर्ण राज्यात 15 ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दीष्ट सरकारने समोर ठेवले आहे. सोमवारपासून पालिकेने मुंबईमधील 9 केंद्रांवर लसीकरण सुरू केले जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लहान मुलांना लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून पालकांनी आपल्या मुलांचे नाव कोविन ऍपवर नोंद करूनच लसीकरण केंद्रावर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.

15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण पासून सुरू झाले आहे, त्यासाठी नऊ जम्बो कोविड सेंटर सध्या सुरू केले आहे. लवकरच लसीकरण केंद्रांचा या आठवड्यात प्रतिसाद पाहून विस्तार करू. प्रत्येक सेंटर मध्ये 5 बूथ आहेत. किमान पाचशे युवकांचे लसीकरण होईल अशी व्यवस्था आहे. मुलांना कोव्हॅक्सीन लस दिली जात आहे. दोन डोस मधील 28 दिवसांचे अंतर असून 9 लाख जणांचे लसीकरण 28 दिवसात पूर्ण करण्याचा मानस आहे. सहा दिवस लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत.

- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

लसीकरण प्रत्येकाने करुन घेतले पाहिजे. त्यामुळे, शाळेत जायला भेटेल, शिवाय कोरोनापासून बचाव होण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे.

- शायना तसनीम खान, विद्यार्थीनी

तनुजा माकडवाला आणि राजन बारी हे लस घेणारे पहिले विद्यार्थी ठरले. बीकेसी जंबो कोविड केंद्रांवर सोमवारी किशोरवयीन मुलांची लसीकरण मोहीम राबवण्यात आली. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या अभियानाचा शुभारंभ केला. या शुभारंभासह, कलिना शास्त्री नगर पालिका शाळेची इयत्ता 10वीची विद्यार्थिनी तनुजा माकडवाला ही लस घेणार्‍या विद्यार्थिनींमध्ये पहिली आणि राजन बारी हा विद्यार्थी ठरला आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी लस घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. आपल्या परिसरात लसीकरणासाठी जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकांनी प्रोत्साहन दिले

लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी आलेले अनेक किशोरवयीन मुलेही त्यांच्या पालकांसह दिसून आली. सांताक्रूझ येथील एका महाविद्यालयाची 12 वीची विद्यार्थिनी रिद्धी मिसाळ ही लसी घेण्यासाठी तिच्या आईसोबत बीकेसी जंबो कोविड सेंटरमध्ये पोहोचली होती. रिद्धीने सांगितले की तिची आई प्रियाने तिला लस घेण्यास प्रोत्साहित केले आहे. त्यामुळे लस घेताना तिला कोणत्याही प्रकारची भीती वाटली नाही. असे दुसरे पालक कन्नन यांचे म्हणणे आहे. कन्नन सांगतात की, त्यांचा मुलगा महादेवन एका विशेष शाळेत शिकतो. आपल्या मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी ते त्याच्यासोबत लसीकरण केंद्रात गेले.

लसीची वाट होती

लस मिळाल्यानंतर ईशा डेव्हिड (16) हिने सांगितले की, कोरोनाची तिसरी लाट पाहता ही लस घेणे आवश्यक होते. त्यामुळेच त्यांनी 1 जानेवारी रोजी या लसीचे ऑनलाइन बुकिंग केले होते. इयत्ता 11 मध्ये शिकणाऱ्या अभिषेक शर्मा (16) यांनी सांगितले की, घरातील सर्व सदस्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तो त्याच्या वळणाची वाट पाहत होता. त्याची प्रतीक्षा सोमवारी संपली. अभिषेकने सांगितले की, संक्रमण काळातील परिस्थिती पाहता जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी लस घेण्याचा निर्णय घेतला.

कोविड विषाणूचे निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांमध्ये लसीकरण हा सर्वाधिक महत्त्वाचा भाग आहे. 15 ते 18 वर्षे वयोगटाच्या लसीकरणास मान्यता मिळाल्याने आता या वयोगटातील प्रत्येक मुलाचे लसीकरण होणे आवश्यक आहे. कोविड लसीचे दोन्ही डोस ठरलेल्या मुदतीत घेवून पाल्यांचे लसीकरण पूर्ण होईल, याकडे पालकांनीही लक्ष द्यावे, असे आवाहन राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने विक्रमी वेळेत एकूण 1 कोटी 80 लाख कोविड मात्रा दिल्या असून यामध्ये पहिली मात्रा 108 टक्के तर दुसरी मात्रा 87 टक्के समाविष्ट आहे. संपूर्ण मुंबईत 400 पेक्षा अधिक केंद्रांवर मिळून वेगाने लसीकरण करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या विकेंद्रीत व लवचिक धोरणासह सर्व लोकप्रतिनिधींचेही लसीकरण मोहिमेला चांगले सहकार्य मिळाल्याचा उल्लेख देखील काकाणी यांनी केला. 15 ते 18 वर्षे वयोगटातील लसीकरणासाठी मुंबईत 9 निर्देशित लसीकरण केंद्र निश्चित केली आहेत. या केंद्रांवर विद्यार्थ्यांना थेट येवून नोंदणी करून लस घेता येईल. ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून नोंदणीची सोय उपलब्ध राहणार असल्याचे नमूद करुन मुंबईत सुमारे 9 लाख नवयुवकांना कोविड लस देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com