

Amritsar CSMT Express
ESakal
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील रेल्वे यार्डमध्ये शुक्रवारी (ता. १७) सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली. गाडी क्रमांक ११०५८ अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेसची नियमित स्वच्छता आणि देखभाल सुरू असताना एम-२ डब्याखाली गुडघ्याखालचा मानवी पाय आढळल्याने रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. देखभाल कर्मचाऱ्यांनी ही बाब निदर्शनास येताच तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली.