esakal | नवी मुंबईत धावणार १०० इलेक्‍ट्रिक बस
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत धावणार १०० इलेक्‍ट्रिक बस

नवी मुंबई महापालिकेतर्फे खरेदी केल्या जात असलेल्या इलेक्‍ट्रिक बस योजनेत केंद्र सरकारने आणखी शंभर बसेस पालिकेला देण्यास हिरवा कंदील दर्शवला आहे. 

नवी मुंबईत धावणार १०० इलेक्‍ट्रिक बस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : डिझेल-पेट्रोलवरील वाढत्या खर्चातून सुटका मिळवण्यासाठी महापालिकेतर्फे खरेदी केल्या जात असलेल्या इलेक्‍ट्रिक बस योजनेत केंद्र सरकारने आणखी शंभर इलेक्‍ट्रिक बस एनएमएमटीच्या पदरी टाकल्या आहेत. पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे २०० इलेक्‍ट्रिक बसची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने त्यांच्या मागणीनुसार शंभर बसेस पालिकेला देण्यास हिरवा कंदील दर्शवला आहे. बस खरेदीबाबतचे पत्र गुरुवारी (ता.२२) एनएमएमटी व्यवस्थापनाला प्राप्त झाले आहे. 

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयातर्फे देशातील महत्त्वाच्या शहरांना हायब्रीड व इलेक्‍ट्रिक बसखरेदीसाठी ‘फेम’ योजनेंतर्गत अनुदान देण्यात येते. पहिल्या टप्प्यातील १० पैकी एक इलेक्‍ट्रिक बस काही दिवसांपूर्वीच एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल झाली; परंतु या वर्षी पुन्हा केंद्र सरकारने फेम-२ योजना सादर केली आहे. या योजनेंतर्गत विकसनशील उपनगरांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत बस दिल्या जाणार आहेत. एनएमएमटी व्यवस्थापनाने बसकरिता चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू केले आहे. तुर्भे, घणसोली, वाशी सेक्‍टर- ९, बेलापूर टर्मिनस व वाशी रेल्वेस्थानक बस आगारात चार्जिंग स्टेशन तयार केले जाणार आहेत. 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहने इंधनावर असल्यामुळे प्रदूषण होत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराला इलेक्‍ट्रिकसारख्या पर्यावरणपूरक वाहनांची जास्त गरज आहे. - अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका.

loading image
go to top