म्हणून खोपोलीतील शेकडो नागरिक रस्त्यावर

खोपोली : नागरिकत्व सुधार कायद्याच्या समर्थनार्थ जागरुक नागरिक मंचाच्या वतीने रविवारी खोपोलीत काढलेली फेरी. 
खोपोली : नागरिकत्व सुधार कायद्याच्या समर्थनार्थ जागरुक नागरिक मंचाच्या वतीने रविवारी खोपोलीत काढलेली फेरी. 

खोपोली : केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ आज खोपोलीत जागरुक नागरिक मंचाच्या वतीने फेरी काढण्यात आली. या वेळी भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी बाजारपेठ दणाणून गेली. हायको कॉर्नरपासून निघालेल्या फेरीत महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 

फेरीचे नेतृत्व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम यांनी केले. 
बाजारपेठ मार्गे दीपक चौक, झेनिथ कॉर्नर, वरची खोपोली, केएमसी महाविद्यालय, पोलिस ठाणे मार्गे आलेल्या फेरीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील प्रांगणात सांगता झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर ठाकूर यांनी फेरीला संबोधित केले. या वेळी त्यांनी सीएए कायद्याच्या बाबतीत चुकीची माहिती पसरवून देशात अशांतता पसरवणाऱ्यांवर शरसंधान साधले. हा कायदा येथील कुठल्याही नागरिकाच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले. या कायद्याबाबत संपूर्ण माहिती घेऊन समजून घ्यावे असे आवाहन केले.  प्रमुख वक्ते विहिंप नेते उमेश गायकवाड यांनी या देशाचे पुन्हा तुकडे करण्यासाठी काही शक्ती कार्यरत आहेत, असा आरोप केला.


हे वाचा : या तालुक्यातील नागरिक तोंडलीमुळे मालामाल

फेरीत जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी पाटील, सचिव शरद कदम, जागरूक मंचचे अध्यक्ष सुनील भालेराव, भाजप शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, हेमंत नांदे, नगरसेविका अपर्णा मोरे, रसिका शेटे, अजय जाखोटिया, तालुका अध्यक्ष बापू घारे, तालुका सरचिटणीस सनी यादव, प्रसाद पाटील, सचिन मोरे, राकेश पाठक, अविनाश मोरे, दीपक कुवळेकर, रोहित कुलकर्णी, करुणेंद्र तिमाने, माजी शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी, विजय तेंडुलकर, राकेश दबके यांसह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. विशेष म्हणजे खोपोली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून रॅलीत सहभाग घेतला. रॅलीत जैन महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय ठरली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com