
मोखाडा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजु लागले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मोखाड्यात भाजपने सर्व पक्षांना धक्का देत, विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी, लोकप्रतिधी आणि कार्यकर्त्यांना गळाला लावले आहे. त्यांचा भाजपात जिल्हाध्यक्ष भरतभाई रजपूत आणि आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश देऊन आपल्या पक्षाची ताकद वाढवली आहे.