esakal | गोकुळाष्टमीला जाऊ नका सांगितल्याने पत्नीवर हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

राबोडी पोलिसांत पतीविरोधात गुन्हा दाखल

गोकुळाष्टमीला जाऊ नका सांगितल्याने पत्नीवर हल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : गोकुळाष्टमी सणाला मित्रांसोबत जाण्यास मज्जाव केल्याच्या रागातून पतीने पत्नीवर हल्ला केल्याचा प्रकार ठाण्यात घडला. रूपाली (27) असे जखमी पत्नीचे नाव आहे; तर पतीचे नाव गोविंदा निगुडकर असे आहे.

विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वीच या दाम्पत्याचा विवाह झाला असून दोघेही पती-पत्नी पेशाने डॉक्‍टर आहेत. याप्रकरणी, पत्नीच्या तक्रारीवरून राबोडी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यातील खोपट परिसरात हे डॉक्‍टर दाम्पत्य राहते. विवाह झाल्यानंतर 2 ऑगस्ट 2019 रोजी घरगुती कारणावरून या दाम्पत्याचे भांडण झाले होते. त्या वेळी रूपाली यांनी राबोडी पोलिस ठाण्यात आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी असल्याने रूपालीने पती गोविंदा यांना गोकुळाष्टमी सण असल्याने बाहेर आपल्या मित्रांसोबत कुठेही जाऊ नका, असे सांगितल्याचा राग आल्याने गोविंदा याने पत्नीला शिवीगाळ करीत ठोशा-बुक्‍याने मारहाण केली.

तसेच गोळ्या कुटण्याचे लोखंडी मुसळ त्याने तिच्या कपाळावर मारून दुखापत केली. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. 24) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top