पत्नीला घरात परपुरुषासोबत पाहिलं; अन्...त्याचाच झाला गेम..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

ऐरोलीतील चिंचपाडा भागात वास्तव्यास असणाऱ्या एका महिलेने अनैतिक संबंधातून आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकरास हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

नवी मुंबई : ऐरोलीतील चिंचपाडा भागात वास्तव्यास असणाऱ्या एका महिलेने अनैतिक संबंधातून आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकरास हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

ही बातमी वाचली का? महाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला मोठा धक्का...

आरोपी महिलेचे नाव लक्ष्मी वाघे असे असून रिक्षाचालक असलेल्या तिच्या प्रियकराचे नाव झिशान सिद्दीकी असे आहे. लक्ष्मी हिचा विवाह काही वर्षांपूर्वी रबाळे येथील कातकरी पाडा येथे राहणाऱ्या रुपेश वाघे याच्यासोबत झाला होता. मात्र त्या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याने लक्ष्मी मुलीसह चिंचपाडा येथे आपल्या आईकडे राहण्यास गेली होती. यादरम्यान तिचे ऐरोलीतील रिक्षाचालक झिशान सिद्दीकी याच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले.

ही बातमी वाचली का? भिवंडीतील ग्रामस्थांची मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे धाव..

दरम्यान, २१ जानेवारी रोजी रात्री झिशान लक्ष्मीच्या घरी गेला असतानाच तिचा पती रूपेशदेखील आपल्या मुलीला भेटण्यासाठी तेथे आला. आपल्या पत्नीला परपुरुषासोबत पाहिल्याने रूपेशचा राग अनावर झाला व त्याने लक्ष्मीला शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर लक्ष्मीनेदेखील रागाच्या भरात रूपेशच्या डोक्‍यात कोयत्याने वार केले; तर तिचा झिशानने रूपेशच्या डोक्‍यात दगड घालून तेथून पलायन केले. त्यानंतर उपचारादरम्यान रूपेशचा मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband murdered by wife in an immoral relationship