esakal | महाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला मोठा धक्का...
sakal

बोलून बातमी शोधा

महाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला मोठा धक्का...

महाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला मोठा धक्का...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या महाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला एक जबर धक्का बसला आहे.  मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. गेल्या सप्टेंबर महिन्यात नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. मात्र आज त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.

मोठी बातमी - "राज ठाकरे यांच्या हिंदुत्वामागे शरद पवार यांचं डोकं"

नरेंद्र पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर पाटील यांनी मनसेच्या तिकीटावर धुळे विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. मात्र त्यांना पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांचा कालावधी उलटला असताना  आता नरेंद्र पाटील यांनी मनसेला रामराम ठोकून सत्ताधारी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

कोण आहेत नरेंद्र पाटील:

नरेंद्र पाटील हे धुळे जिल्ह्यातील विखरण गावचे आहेत. त्यांचे वडील धर्मा पाटील यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी २२ जानेवारी २०१८ रोजी मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. दुर्दैवाने उपचारादरम्यान 28 जानेवारीला त्यांचं निधन झालं होतं. धर्मा पाटील यांच्या निधनानंतर नरेंद्र पाटील आणि त्यांच्या आईने तत्कालीन फडणवीस सरकारविरोधात तीव्र आंदोलन केलं होतं. माजी मंत्री गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली होती. 

मोठी बातमी - नवी मुंबई, ठाण्याच्या वेशीवर 'घडतोय' हा प्रकार!

नरेंद्र पाटील यांनी 2018 मध्ये विखरण गावातील मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्येचा इशाराही दिला होता. भूसंपादन प्रक्रियेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ नरेंद्र पाटलांनी हा पवित्रा घेतला होता. मात्र त्यानंतर मनसे कडून त्यांना आधार देणहयात आला होता म्हणून त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता.

मात्र आता नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार माजिद मेमन या मंत्र्यांच्या उपस्थितीत नरेंद्र पाटील यांनी पक्षप्रवेश केलाय. 

big blow to MNS on their first ever mahamelawa at nesco ground goregaon 

loading image