
मुंबई : हैदराबाद गॅझेटियरनुसार राज्यातील भटक्या विमुक्त जाती या आदिवासी गणल्या जातात. या गॅझेटचा आधार घेत मराठ्यांना कुणबी केले जाणार असेल तर आम्हालाही आम्ही स्वातंत्र्यापूर्वी असलेल्या आदिवासीत नोंद करून आम्हाला आदिवासीचे दाखले द्या आणि त्यात गणना करा, अशी मागणी राज्यातील भटक्या विमुक्त जमातीतील तज्ज्ञांकडून केली जात आहे. त्यासोबत ओबीसीमध्ये मराठा आल्याने राज्यातील भटक्या विमुक्तांना कधीही राजकीय लाभ मिळणार नाहीत, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.