esakal | "जनतेच्या प्रत्येक पैशाचा हिशोब देईन" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

"जनतेच्या प्रत्येक पैशाचा हिशोब देईन" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

"जनतेच्या प्रत्येक पैशाचा हिशोब देईन" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यानी मात्रालायातील अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील पत्रकार कक्षात पत्रकारांशी संवाद साधला.

याच पत्रकार परिषदेत आरेतील कारशेड बद्दल अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरेतील कारशेडवर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलीये. याचसोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  

सुरवातीलाच, मी मुख्यमंत्री म्हणून न सांगता, अनपेक्षितपणे आलोय. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. आपल्याला कल्पना आहे, स्वतःसाठी ठाकरे घराण्यांनी कधीच प्रयत्न केलेले नाहीत. या काळात मी जबाबदारी टाकून पळालो असतो तर शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून मला नाव लावता आलं नसतं. 

येत्या काळात महागाई आणि भ्रष्टाचाराचा सामना करावा लागणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मी अद्याप सभागृह पाहिलेलं नाही, मला रुळायला जरा वेळ लागेल. आपल्यातील जिव्हाळा मला त्यावेळी लागेल असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना देखील एक सल्ला दिलाय. कुणावर टीका करत असताना आपण ज्यावर टीका करतोय त्याला ते समजलं पाहिजे आणि समोरच्यामध्ये सुधारणा व्हायला हवी. माध्यमांनी, पत्रकारांनी  सरकारचं नाक, कान, डोळे म्हणून काम केलं पाहिजे. एखादी घोषणा केल्यावर त्याची कुठे अंमलबजावणी झाली, कुठे नाही झाली ते समजायला माध्यमांनी सरकारला मदत करावी. मात्रालयातील पत्रकार पक्ष 'दक्ष' असावा असं उद्धव ठाकरे म्हणालेत. गेल्या काळात आम्ही सत्तेत होते का नव्हतो ते कुणाला समाजाला नव्हतं असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.   

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • रातोरात झाडांची कत्तल मंजूर नाही. कोणत्याही विकासाच्या कामाला स्थगिती नाही. मेट्रोला नाही तर मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती 
  • जोवर आरेच्या पुनर्विकासाबद्दल काही धोरण ठरत नाही तोवर आरे कारशेडमधील एक पान देखील तोडणार नाही
  • मातोश्री बद्दल काही वेगळं सांगणार नाही, एखादी जबाबदारी घेतल्यानंतर ती पार पडण्यासाठी जे गरजेचे असते.
  • मुळात जनतेला भेटणं, इतर काही गोष्टी, त्यामुळे तिथे जेव्हा जेव्हा जाणं गरजेचे असेल ते मी करणार
  • पत्रकारांकडून उत्तरासकट प्रश्न हवेत. 
  • माझ्या जनतेच्या एकाही पैशाची उधळपट्टी होणार नाही याची काळजी माझे अधिकारी घेतील
  • जनतेच्या एकाही पैशाची उधळपट्टी होणार नाही, जनतेसाठी नेहमी उत्तरदायी राहीन 
  • प्रथा, परंपरा माहीत नाही तरी सुद्धा मी शिवधनुष्य उचललं आहे. मोठी आव्हानं पाहून मी पळालो नाही 
  • मला प्रश्न विचारा, उत्तरासकट प्रश्न विचारा
  • टीका करताना चुका दाखवा, ओरबाडणे म्हणजे टीका करणे नाही 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवरायांना वंदन करुन मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. विकासाशी संबंधित कामं तातडीने सुरु करण्याचे निर्देश,  सामान्यांच्या पैशाचा दुरुपयोग न होण्याकरिता त्यांनी सावध राहण्याचेही निर्देश दिलेत. आज मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे मेट्रो कारशेडवर निर्णय घेतलाय. त्याच पद्धतीने आता  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी निर्णय येतोय याचीच महाराष्ट्रातील जनता वाट पाहतेय. 

Webtitle : I am answerable for single penny spent by state government says uddhav thacjeray