ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते - नारायण राणे

बीकेसीतील सभेवर राणेंकडून सडकून टीका
Narayan Rane
Narayan Rane Narayan Rane

मुंबई : उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते, असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बीकेसीतल्या सभेतील भाषणावर राणे यांनी पत्रकार परिषदेत सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांनी मोठी जाहीरातबाजी करून ही सभा घेतली असा आरोपही यावेळी राणे यांनी केला. (I am ashamed to call Uddhav Thackeray as Chief Minister says Narayan Rane)

Narayan Rane
केतकी चितळे प्रकरणात पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

राणे म्हणाले, "मोठा गवगवा करुन उद्धव ठाकरेंनी बीकेसीत जाहीर सभा घेतली. कुठलीही निवडणूक नाही, तरीही एवढी जाहीरातबाजी करुन त्यांना सभा घ्यावी लागली. शक्तीप्रदर्शन करण्यासाठी त्यांनी ही सभा घेतली. या सभेला इतका जास्त खर्च केलाय की, त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणायला मला लाज वाटते. यशवंतराव चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या प्रतिमेबरोबरच महाराष्ट्राची प्रतिमा वाढवण्याचं काम केलं. दिग्गज होते सगळे, राज्यातून नंतर दिल्लीला अनेकजण केले आणि देशातही आपली कारकीर्द त्यांनी गाजवली. पण परवाचा भाषण ऐकल्यानंतर वाईट वाटलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं"

Narayan Rane
"...अन् आयुक्त चहल रडले"; मुख्यमंत्र्यांनी कथन केला 'तो' भयानक किस्सा

लोकांच्या चुली पेटवायला निघालात? उलट लोकांचं जीवन उद्ध्वस्त करायला निघाला आहात. दिशा सालियानचा संसार उद्ध्वस्त केलात, सुशांत सिंगचा केलात, पूजा चव्हाण यांचं जीवन उद्ध्वस्त केलं आणि चुली पेटवणार म्हणतात. मुख्यमंत्र्यांचं भाषण म्हणजे खोटारडेपणा आणि बोगसपणा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Narayan Rane
वर्षभरापूर्वी अ‍ॅम्ब्युलन्सचे भोंगे वाजायचे आता इतर भोंगे वाजतायत - मुख्यमंत्री

कसलं मुल्यमापन करता तुम्ही? अयोध्येत तुमचे लोक होते तुम्ही कुठे होतात? शिवसेनेच्या ३५ वर्षांच्या वाटचालीत तुम्ही दिसलात का? मराठी तरुणांच्या हातात तुम्ही दगडच दिलेत. दगड देऊन ज्या लोकांनी केसेस अंगावर केले आज उद्ध्वस्त झाले. विठ्ठल चव्हाण, रमेश मोरे, जया जाधव हे का मेले हे अजून कळलं नाही. मुख्यमंत्र्यांनी शोधून काढावं. इतिहास काढायला लावू नका तुम्ही कधीच नव्हता तिथे, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

हिंदुत्व डोक्यात होतं तर २०१९ ला का गेलं?

हिंदुत्व सोडलं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले हिंदुत्व डोक्यात असतं तर यांच्याबरोबर गेले असते का? यांच्यामध्ये विकृत बुद्धीचे लोक दुसऱ्यांवर आरोप करतात. फडणवीसांच्या वजनावर बोलता तर आधी स्वतःचा चेहरा आरशात पाहा आणि मग दुसऱ्यांच्या शरीरावर टीका करा. हेराफेरी करुन लोकांचा विश्वास संपादन करता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com