'मी हरामखोर नाही, सगळ्यात जास्त मानधन घेणारी आभिनेत्री'! संजय राऊतांनी माफी मागावी, कंगनाची मागणी

युगंधर ताजणे
Thursday, 17 September 2020

 मी सर्वाधिक टॅक्स भरते, जादा टॅक्स भरणा-यांच्या यादीत माझे नाव आहे. आतापर्यत अनेकांना रोजगार दिला आहे. मी हरामखोर नाही, सगळ्यात जास्त मानधन घेणारी आभिनेत्री आहे.

मुंबई -  मी सर्वाधिक टॅक्स भरते, जादा टॅक्स भरणा-यांच्या यादीत माझे नाव आहे. आतापर्यत अनेकांना रोजगार दिला आहे. मी हरामखोर नाही, सगळ्यात जास्त मानधन घेणारी आभिनेत्री आहे. माझ्यावर आरोप करणा-या संजय राऊत यांनी आपली माफी मागावी. अशी मागणी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेञी कंगणाने केली आहे. 

महाराष्ट्राचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयातील कर्मचारीच का देतायत आंदोलनाचा इशारा ?

  गेल्या काही दिवसांपासुन वादग्रस्त विधानामुळे कंगना चर्चेत आहे. या विधानांमुळे तिला अनेक स्तरांतुन टीकेला सामोरे जावे लागत आहे. यासगळयात महारा्ष्ट्र सरकार आणि बॅालीवुडमधील माफीयासोबत तिची तु-तु मैं सुरु आहे. आता तर एकामागुन एक कलाकार कंगणाच्या वक्तव्यांचा समाचार घेऊ लागले आहेत. कंगणा म्हणाली, आता मला सारखे धमक्यांचे फोन येऊ लागले आहेत. पालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईत कंगणाच्या घराचा काही भाग तोडण्यात आला आहे. घर तोडल्यानंतर आपल्यावर कुणी बलात्कार केला आहे अशी भावना कंगणाने व्यक्त केली आहे. ती म्हणते, कुठलेही सरकार हे सर्व नागरिकांसाठी पित्यासमान आहे. 

रक्षण करणारे जेव्हा भक्षक होतात अशावेळी नागरिकांनी काय करायचे असा सवालही तिने उपस्थित केला आहे. माझ्या घरासोबत जे काही झाले ते सरकारमुऴे कुण्या एका व्यक्तिमुऴे नव्हे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला कंगणाने कडक शब्दांत उत्तर दिले आहे. आपण सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेञी असुन मोठया प्रमाणात शासनाच्या तिजोरीत कर भरते. याशिवाय कित्येकांना रोजगार देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली आहे. 

शिवसेना खासदाराने केलं भाजप सरकारचं तोंडभरून कौतुक; वाचा 'हे' आहे कारण

 बॅालीवुडला ड्रग्सची लागण झाली असल्याचे विधान कंगणाने केल्याने ती वादाच्या भोव-यात सापडली आहे. मुंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर असल्याच्या विधानावरुन तिला आता धमक्या येण्यास सुरुवात झाली आहे. आपले मिञ, नातेवाईक आणि शेजारी यांना टॅाचर केले जात आहे. आपल्याला शिवीगाळ करुन धमकी दिली जात आहे. ड्रग्जच्या केसेसमध्ये अडकवु असे म्हणुन दबाव टाकला जात आहे. कंगणाच्या वादग्रस्त विधानाला उत्तर देण्यात आता समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन आणि बॅालीवुडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनीही उडी घेतली आहे. अभिनेञी उर्मिला मातोंडकर हिने नुकतीच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगणावर टीका केली. यामुऴे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I am the highest paid actress Sanjay Raut should apologize Kangana demands