"शिवसेनेने गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे विरोधकांना सांगायची तयारी"

शिवसेनेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांचे भाजपला खुले आव्हान
Shivsena
Shivsenasakal media

डोंबिवली : कल्याण- डोंबिवलीनंतर दिव्यात (Diva)देखील विकासकामांवर शिवसेना भाजपमध्ये राजकीय वादावादीला सुरुवात झाली आहे. दिव्यात शिवसेनेचे 8 नगरसेवक असूनही दिव्यात वॉटर, मीटर, गटर सुविधा आली नाही. 800 कोटी गेले कुठे ? याचा हिशोब दिवेकरांना द्यावा लागेल असा सवाल करत भाजपचे आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांनी आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेला (Shivsena) केला होता. यावर कोणत्याही विषयावर बोलताना माहिती घेऊन बोलले पाहीजे. आमदारांनी शिवसेनेच्या कोणत्याही शाखेत जाऊन आधी माहिती घ्यावी. शिवसेनेने गेल्या 5 वर्षात कोणती कामे केली आहेत, हे त्यांना सांगायला मी तयार आहे असे खुले आवाहन शिवसेनेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी (Ramakant Madhavi) यांनी दिव्यात दिले.

Shivsena
नवी मुंबईतील झोपडपट्टी धारकांना दिलासा; प्रत्येक घरात नळजोडणी

दिवा येथे रविवारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या सुमारे 500 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करीत शिवबंधन हाती बांधले. माजी उपमहापौर मढवी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी निलेश पाटील, अर्चना पाटील, चरण म्हात्रे, दर्शना म्हात्रे, आदेश भगत यांसह अनेकजण उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या तोंडावर दिव्यात शिवसेनेने विरोधी पक्षासह मित्र पक्षातील कार्यकर्त्यांना देखील आपल्या पक्षात घेत पक्षाची ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे.

नगरसेवकांची संख्या वाढवित दिव्याच्या विकासाकडे काही दिवसांपूर्वीत दिव्यातील पाणीटंचाईच्या समस्येविषयी भाजपच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी आमदार संजय केळकर यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींवर निशाणा साधत दिवेकरांचा विश्वासघात हा शिवसेनेने केला आहे. सर्वच्या सर्व 8 लोकप्रतिनिधी शिवसेनेचे असून देखील साधे वॉटर, गटर, मीटरची सुविधा देऊ शकलेले नाहीत. 800 कोटी गेले कुठे ? याचा हिशोब दिवेकरांना द्यावा लागेल. दिवेकर त्याचा हिशोब चुकता केल्याशिवाय रहाणार नाही व भाजपा त्यांच्यासोबत आहे असे आवाहन त्यांनी सत्ताधारी शिवसेनेला केले होते.

Shivsena
ॲट्रॉसिटीतील पीडितांना आर्थिकसाह्य; १ कोटी २८ लाखांची तरतूद

याविषयी मढवी यांना विचारले असता ते म्हणाले. कोणत्याही विषयावर बोलताना माहिती घेऊन बोलले पाहीजे. चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत गेली असून त्यावर त्यांनी राजकीय स्टेटमेंट केली आहे. माझे त्यांना सांगणे आहे की तुम्हाला माहिती पाहीजे असेल तर शिवसेनेच्या कोणत्याही शाखेत जाऊन माहिती घ्यावी. राजकीय स्टेटमेंट म्हणून ते बोलले असतील तर कोणत्याही व्यासपीठावर त्यांनी बोलवावे 5 वर्षात शिवसेनेने काय काम केले हे सांगायला मी तयार आहे असे खुले आवाहन भाजप आमदारांना दिले आहे. दिव्यातील कचराभूमीवरुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्यानंतर आता पाण्यावरुनही शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावर आता भाजप सेनेला कोणत्या मंचावर बोलावते हे पहावे लागेल.

दिव्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी वाढीव पाणी दिव्याला मंजुर झाले आहे. त्याविषयी मढवी म्हणाले, 2017 ला दिव्याला 21.5 एमएलडी पाणी मिळत होते. निवडणूकीनंतर 10 एमएलडी वाढीव पाणी सेनेने वाढवून घेतले होते. त्यानुसार 31.5 एमएलडी पाणी दिव्याला मिळणे आवश्यक होते. परंतू एमआयडीसीच्या पाईपलाईन या 45 वर्षे जुन्या झालेल्या असल्याने सातत्याने फुटने, लिकेज होणे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून एमआयडीसीने पाण्याचा प्रेशर कमी केल्याने दिव्याला 27.5 एमएलडी पाणी मिळत आहे. 212 कोटी पाण्याचा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसांत दिव्याला तात्पुरत्या स्वरुपात 35.5 एमएलडी पाणी मिळणार आहे. 31 एमएलडी पाणी सध्या दिव्याला मिळत असून उर्वरीत पाण्यासाठी पालिकेची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com