esakal | माझा पंतप्रधान मोदींवर पूर्ण विश्वास आहे - संजय राऊत

बोलून बातमी शोधा

Sanjay-Raut-Sad
माझा पंतप्रधान मोदींवर पूर्ण विश्वास आहे - संजय राऊत
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणास निवडणूक आयोग जबाबदार आहे. निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, ही मद्रास उच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यावी, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. "लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत की, निवडणुका महत्त्वाच्या आहेत?. भाजपाचे काही मोठे नेते आम्हाला ज्ञान देत होते. निवडणुका आणि कोरोनाचा काही संबंध नाही. अन्य राज्यात निवडणुका नाहीत तिथेही कोरोना वाढतोय."

"संपूर्ण देशातून प्रचारासाठी बंगालमध्ये लोक गोळा केले. ते आपपाल्या राज्यात गेले आणि कोरोना संक्रमण वाढलं" असं संजय राऊत म्हणाले. "माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी त्यांनी रणनिती बनवली आहे. ते मद्रास उच्च न्यायालयाची टिप्पणी गांभीर्याने घेतील" असे राऊत म्हणाले.

हेही वाचा: मोठी बातमी - मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

"आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारा भारताचा अपमान हा राजकारणाचा विषय नाही. कुठलाही नेता किंवा देशातील सरकारचा अपमान होणं योग्य नाही. प्रसंगी आपसातील मतभेद विसरुन पंतप्रधानांसोबत उभे राहू" असे राऊत म्हणाले. "देशातील कोरोना स्थितीबद्दल जे चित्र रंगवलं जातय. त्याचा सामाजिक स्वास्थावर परिणाम होतोय. भारताच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवण्याचा हा आंतरराष्ट्रीय कटही असू शकतो" असे राऊत म्हणाले.