मला 'नाईट लाईफ' हे शब्दच आवडत नाही - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

मुंबई - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू होणार अशी घोषणा केली. २६ जानेवारी पासून प्रायोगिक तत्वावर मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "नाईट लाईफ"  हा शब्दच मला आवडत नाही असं मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी म्हंटलय. IPS अधिकाऱ्यांसोबतच्या एका कॉन्फरन्सदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. 

भीषण : दिल्ली हैद्राबादनंतर मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार.. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे:

"प्रत्येक शहराची स्वतंत्र संस्कृती असल्यामुळे 'नाईट लाईफ'चा प्रस्ताव राज्यभर राबवणे योग्य ठरणार नाही. मुंबईत ठराविक ठिकाणी हे प्रायोगिक स्वरूपात राबवू शकतो. मूळात मला नाईट लाईफ  हा शब्दच आवडत नाही,” असं उदधव ठाकरे यांनी म्हंटलय. 'नाईट लाईफ'ला  विरोध नाही मात्र हा शब्द मला आवडत नाही असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणालेत. 

कशी असेल मुंबईची नाईट लाईफ ? 
 
मुंबईतील नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी नाईट लाईफ प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या काळात निवडक भागात मॉल्स, हॉटेल्स,   रेस्टॉरंट्स २४ तास खुले ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्वांचं मूल्यांकन केलं जाईल. त्यातून लोकांच्या तक्रारीही दूर करण्यात येतील असं देखील सांगण्यात आलं आहे. 

मोठी बातमी - कांदा पुन्हा रडवतोय! झाली 'इतकी' दरवाढ...

येत्या २६ तारखेला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला याची सुरूवात होणार आहे. नाईट लाईफ संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुरक्षेचं कारण पुढे केलं होतं, मात्र तरीही नाईट लाईफ मुंबईत सुरू होणार आहे. १६ जानेवारी रोजी आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका आयुक्त, वरिष्ठ पोलिस, मॉल आणि हॉटेल असोसिएशनच्या प्रमुखांची भेट घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

i dont like night life word says maharashtra cm uddhav thackeray at bi-annual crime conference of IPS officers

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: i dont like words night life says maharashtra cm uddhav thackeray at bi annual crime conference of IPS officers