esakal | मंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत धनंजय मुंडे यांनी केला मोठा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत धनंजय मुंडे यांनी केला मोठा खुलासा

मी राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा स्वतः सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

मंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत धनंजय मुंडे यांनी केला मोठा खुलासा

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः मी राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा स्वतः सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. माझा राजीनामा मागितला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

दरम्यान राजीनामा देण्याची चर्चा तत्थहीन असल्याचं मुंडे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे. पक्षानं राजीनामा मागितलेला नसल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. 

धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबंध आहेत, तसंच या संबंधातून आपल्याला दोन मुलं आहेत, अशी कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली होती. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आज सकाळी मुंबईच्या मलबार हिल येथील चित्रकूट बंगल्यावर धनंजय मुंडे पोहोचले. 
पहाटे अडीच-तीनच्या सुमारास धनंजय मुंडे एका खासगी गाडीतून चित्रकूट बंगल्यावर आले. त्यानंतर दिवसभर चित्रकूट बंगल्यावर कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. मग दुपारनंतर धनंजय मुंडे हे जनता दरबारसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात गेले. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावर अधिकृत भूमिका मांडली.  तसंच वाय.बी. चव्हाणला देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची बैठक झाली.

शरद पवार यांची प्रतिक्रिया

धनंजय मुंडे मला भेटले, त्यांनी सर्व आरोप आणि या प्रकरणाची सर्व स्थिती मला सांगितली. त्यांच्या माहितीनुसार त्यांचे काहींशी घनिष्ठ संबंध होते. त्याप्रकरणी काही तक्रारी झाल्या, पोलिसात त्यांच्या बद्धलची तक्रार आली. व्यक्तिगत हल्ले होतील असा अंदाज त्यांना असावा म्हणून त्यांनी याआधीच हायकोर्टात आपली भूमिका मांडली आहे. कोर्टाचा एक आदेश त्यांनी प्राप्त करून घेतला होता . तो हायकोर्टाचा आदेश असल्याने त्यावर भाष्य करण्याचं काही काम नाही, असं शरद पवार म्हणालेत.

हेही वाचा- धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटील यांची अधिकृत भूमिका

यापुढे शरद पवार म्हणालेत की, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचे स्वरूप गंभीर आहे. त्यामुळे या संबंधीचा काहीतरी निर्णय पक्ष म्हणून आम्हाला घ्यावा लागेल. यासाठी मी पक्षाचे प्रमुख सहकाऱ्यांशी बोलणार आहे. धनंजय मुंडे यांनी मला दिलेली सर्व माहिती पक्षातील प्रमुख सहकार्यांना देणार आहे. सर्वांना याबाबतची माहिती देऊन सर्वांची मते लक्षात घेऊन पुढील पावले टाकणे हे आम्ही लवकरात लवकर करण्याच्या विचारात आहोत. मला असं वाटत नाही की याला फारसा विलंब करावा. कोर्टाचे निर्णय होतील, पोलिसांची चौकशी होईल त्यावर मला बोलायचं नाही. मात्र पक्ष म्हणून आणि पक्ष प्रमुख म्हणून जो काही निर्णय, जी काही काळजी घ्यावी लागेल तो आम्ही घेऊ.

I have not resigned ncp minister Dhananjay Munde Comment on resignation

loading image