esakal | धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटील यांची अधिकृत भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटील यांची अधिकृत भूमिका

धनंजय मुंडेंवरील आरोपांची शहानिशा केल्याशिवाय निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. आम्ही यात कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटील यांची अधिकृत भूमिका

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंची सध्या प्रचंड कोंडी झाली आहे. फेसबुकवर दिलेले स्पष्टीकरण वगळता धनंजय मुंडे यांनी याप्रकरणात अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही आहे. या सगळ्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत भूमिका मांडली आहे. 

धनंजय मुंडेंवरील आरोपांची शहानिशा केल्याशिवाय निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. आम्ही यात कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच पक्षाच्या अंतर्गत मुंडे प्रकरणाचा आढावा घेतला जाईल. गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झालेत. तर नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जप्रकरणात अटकेत आहे. या दोन्ही प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते सावध प्रतिक्रिया देत आहेत. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तर नवाब मलिक यांच्या जावयाच्या प्रकरणातही कोणताही सरकारी हस्तक्षेप नाही.
जावयानं एखादी चूक केली असेल तर त्याचा सासऱ्यावर परिणाम होण्याची गरज नाही असंही जयंत पाटील म्हणालेत.

हेही वाचा- मंत्री नवाब मलिक यांच्या मुलीच्या घरी NCBचा छापा, जावयाला अटक

Official role ncp State President Jayant Patil ncp leader Dhananjay Munde case