यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात ST गेली वाहून, तीन जणांचा मृत्यू

st bus
st bus e sakal

- अरविंद वझलवार

उमरखेड : गुलाब चक्रीवादाळामुळे राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. जोरदार पाऊस सुरु असताना एसटी चालकाने पुराच्या पाण्यातून बस काढण्याचा प्रयत्न जिवावर बेतला आहे. सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान नांदेडहून नागपूरला पुसदमार्गे जाणारी बस उमरखेडपासून दोन किमी दहांगाव नाला पार करत असताना पुराच्या पाण्यात बस वाहून गेली. पुराच्या पाण्यातून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न बस चालकाने केला. मात्र, त्यावेळीच बस पुराच्या पाण्यात वाहून गेली. बसमध्ये साधरणमध्ये पाच जण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी ५०१८ ही बस नांदेडहून पूसदमार्ग नागपूरला निघाली होती.दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थितीती उद्भवली आहे. उमरखेडपासून दोन किमी अंतरावर असलेल्या दहांगाव नाला येथून चालकाने बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूराच्या पाण्याच्या वेग जास्त होता. यामध्ये बस वाहून गेली आहे.

उमरखेड ते पुसद मार्गावर दहागाव नाल्यावर नागपूर आगाराची बस क्र. ५०१८ वाहून गेली. या बसमध्ये पाच जण होते. दोन प्रवाशांना वाचवण्यात यश असून तीन मृतदेह मिळाले. आहे. घटनास्थळापासून 50 मीटरवर बस आढळल्याची माहिती यवतमाळचे प्रभारी विभाग नियंत्रक अविनाश राजगुरे यांनी दिली.

उमरखेड तहसीलदार ठाणेदार सध्या घटनास्थळी दाखल आहेत. स्थानिक नागरिक व तालुका टिमच्या सहाय्याने लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.. दोन लोक झाडावर चढलेले आहेत व दोन लोक एसटीबसच्या टपावर आहेत. त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र चालकाच्या अतिआत्मविश्वासामुळे लोकांचा जीव धोक्यात गेला होता. या बस चालकावर कारवाई होणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com