
Mumbai latest News: मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात तरुण हे व्यसनाच्या विळख्यात सापडले आहेत. जे तरुण नशेच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी तयार होतील, त्यांच्यावर उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी घेईन, असे आश्वासन मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांनी पीएमजीपी कॉलनीतील प्रचार सभेत दिले. या आवाहनाला स्थानिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.