

Tukaram Mundhe Viral Video
Sakal
मुंबई : IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या आधारे त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना पाठिंबा दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दाव्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने स्पष्टीकरण दिले आहे.