जाणून घ्या आणखी प्रगत आणि जलद निदान करणाऱ्या 'कोरोना रॅपिड अँटीबॉडी तपासणी' बद्दल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आयसीएमआरनं कोरोनाच्या चाचण्यांसंदर्भात नवीन नियमावली जारी केली आहे . यात  रॅपिड अँटीबॉडी रक्ततपासण्यांवर भर देण्यात आला आहे.

मुंबई : कोरोना म्हणायला एक छोटा व्हायरस. मात्र आज संपूर्ण जग या व्हायरसच्या विळख्यात आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे आयसीएमआरनं कोरोनाच्या चाचण्यांचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आयसीएमआरनं कोरोनाच्या चाचण्यांसंदर्भात नवीन नियमावली जारी केली आहे . यात  रॅपिड अँटीबॉडी रक्ततपासण्यांवर भर देण्यात आला आहे. यामुळे चाचण्या करण्याची पद्धत अधिक प्रगत होणार आहे आणि कोरोनाचं निदान जलद गतीनं होऊ शकणार आहे.

चिंताजनक ! कल्याण डोंबिवलीत आणखी सहा COVID 19 रुग्ण वाढले...

कशी असणार आहे नवीन चाचणी पद्धत:

  • या चाचणीत संशयितांच्या रक्ताची तपासणी करण्यात येणार आहे.
  • रक्ताची तपासणी करून कोरोना संदर्भात प्रतिकारक्षमतेवर किती परिणाम झाला  हे बघता येणार आहे.
  • ताप आणि कोरोनाशी संबधित इतर सर्व लक्षणांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
  • ताप, खोकला, सर्दी  यांसारखी लक्षणं असलेल्या रुग्णांची रॅपिड अँटीबॉडी तपासणी करण्यात येणार आहे.
  • संसर्ग वाढू नये यासाठी अशा  प्रकारच्या चाचण्यांची सुरुवात करण्यात येणार आहे.
  • डॉक्टरांनी दिलेल्या निर्देशानंतर या चाचण्यांचे विश्लेषण करण्यात येणार आहे.  
  • वैद्यकीय नियमावलीनुसार चाचणी पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे स्पष्ट करण्यात येणार आहे.
  • रुग्ण पॉझिटिव्ह निष्पन्न आला तर त्याच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांचं विलगिरण करण्यात येणार आहे.

मोठी बातमी - 'हे' आहेत मुंबईतील ८ कोरोना हॉटस्पॉट, इथे आहेत मुंबईतील सर्वाधिक COVID19 रुग्ण

इतर देशांच्या तुलनेत भारतात आतापर्यंत कमी प्रमाणात चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकारनं चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यासोबतचं अधिक सक्षम आणि अचूक चाचणी करण्याची पद्धत आणली आहे. दिवसाला आतापर्यंत ५००० हजार चाचण्या करण्यात येत होत्या. मात्र आता ही संख्या १० हजार करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं घेतला आहे.

ICMR has given permission to conduct faster and latest corona rapid antibody test


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICMR has given permission to conduct faster and latest corona rapid antibody test