चिंताजनक ! कल्याण डोंबिवलीत आणखी ६ COVID 19 रुग्ण वाढले...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी म्हणजेच ६ एप्रिल रोजी पुन्हा नवीन सहा रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता पालिका हद्दीत रुग्णांची संख्या ३४ झाली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी म्हणजेच ६ एप्रिल रोजी पुन्हा नवीन सहा रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता पालिका हद्दीत रुग्णांची संख्या ३४ झाली आहे. यापैकी सहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, शहरात रोज नवीन रुग्ण आढळत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. सदर आकडेवारी सहा एप्रिल दुपारी ३ पर्यंतची आहे.  

मोठी बातमी -  'हे' आहेत मुंबईतील ८ कोरोना हॉटस्पॉट, इथे आहेत मुंबईतील सर्वाधिक COVID19 रुग्ण

नवीन रुग्णांपैकी तीन रुग्ण हे डोंबिवली पश्चिम, दोन रुग्ण कल्याण पश्चिम, तर एक रुग्ण डोंबिवली पूर्वेतील आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेंटमेंट प्लॅनप्रमाणे महापालिकेच्या २१० आरोग्य पथकामार्फत १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण चालू असून, नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरित महापालिकेच्‍या रुग्‍णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

मोठी बातमी - सायबर भामटेगिरीला आलाय ऊत, 'या' पाच गोष्टींनी तुमची होऊ शकते फसवणूक ...

मुंबईत कोरोना हॉटस्पॉट्सची संख्या दुप्पट   

महाराष्ट्रात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत. दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतोय. अशात मुंबईकरांची चिंता वाढताना दिसतेय. अशात आता मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. काल म्हणजेच ५ एप्रिल २०२० पर्यंत मुंबईत कोरोनाचे ४ हॉटस्पॉट होते त्याच चार हॉटस्पॉटची संख्या ८ वर गेलीये. म्हणजेच मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या दुपटीने वाढलीये. यामध्ये मुंबईतील इ वॉर्ड, एच इस्ट वॉर्ड, पी नॉर्थ वॉर्ड आणि एम वेस्ट वॉर्ड यांचा समावेश आहे

six new cases of corona positive detected from kalyan dombivali area


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six new cases of corona positive detected from kalyan dombivali area