CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयडॉलची स्वतंत्र परीक्षा

तेजस वाघमारे
Thursday, 22 October 2020

विधी आणि बीपीएड अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा घेण्याचे निश्‍चित केले आहे. त्यानुसार 6,7 आणि 9 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आयडॉलकडे नोंदणी करणे करणे बंधनकारक आहे.

मुंबई: सीईटी परीक्षा आणि आयडॉलची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्यानुसार विधी आणि बीपीएड अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा घेण्याचे निश्‍चित केले आहे. त्यानुसार 6,7 आणि 9 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आयडॉलकडे नोंदणी करणे करणे बंधनकारक आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विधी, बीपीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश 2, 3, 4 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केली आहे. याचे वेळापत्रक सीईटी सेलने 21 सप्टेंबरला जाहीर केले आहे. यानंतर आयडॉलने अंतिम सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार सीईटी परीक्षा आणि आयडॉलची परीक्षा एकाच दिवशी आल्याने अनेक विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आयडॉलची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. याची दखल घेत आयडॉलने 2,3,4 नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या विधी आणि बीपीएड या सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 6,7 आणि 9 नोव्हेंबर 2020 दिवशी स्वतंत्र परीक्षाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

अधिक वाचा-  नवी मुंबईत रुग्ण दुपटीचा वेग तब्बल १२७ दिवसांवर

या दिवशी आयडॉलच्या तृतीय वर्ष बीए, बीकॉम आणि एमए या अभ्यासक्रमाच्या परीक्षा आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी आयडॉलने दिलेल्या onlineexam2020@idol.mu.ac.in या ईमेलवर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या सीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र देखील ईमेलवर देणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी त्याचे नाव, परीक्षेचे नाव,आसन क्रमांक, ईमेल, मोबाईल क्रमांक आणि परीक्षा देणाऱ्या पेपरचे नाव इत्यादी माहिती ईमेलमध्ये देण्यात यावी, यानुसार या विद्यार्थ्यांची ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

-----------------------

(संपादनः पूजा विचारे)

Idol separate exam students taking CET exam Registration required November


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Idol separate exam students taking CET exam Registration required November