कोरोनाची दुसरी लाट आल्यास शाळांबाबत फेरविचार! बच्चू कडू यांचे संकेत

तेजस वाघमारे
Sunday, 22 November 2020

मुंबई, ठाणे आणि काही जिल्हे वगळता राज्यात उद्यापासून (ता. 23) शाळा पुन्हा सुरू होणार आहेत; मात्र दिल्लीमध्ये कोरोनाच्या उद्रेकानंतर राज्यात रुग्णसंख्या वाढली तर या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो, असे संकेत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. 

मुंबई : मुंबई, ठाणे आणि काही जिल्हे वगळता राज्यात उद्यापासून (ता. 23) शाळा पुन्हा सुरू होणार आहेत; मात्र दिल्लीमध्ये कोरोनाच्या उद्रेकानंतर राज्यात रुग्णसंख्या वाढली तर या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो, असे संकेत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. 

हेही वाचा - मनसेच्या बॅनरबाजीचा सरकारला शॉक! बेस्ट कर्मचाऱ्यांसह पोलिसांची धावाधाव

राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय 15 दिवसांपूर्वी तत्कालीन परिस्थितीनुसार घेतला होता. त्यासाठी पुरेशी तयारी राज्य सरकारने केली होती; मात्र त्या वेळी कोरोनाची दुसरी लाट येईल, असे वाटले नव्हते; मात्र दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा कोरोनाचा उद्रेक झाला. राज्यातही रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दुसरी कोरोना लाट आल्यास शाळा सुरू ठेवण्याबद्दल फेरविचार करण्यात येईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेवटी शिक्षण घेता येईल; मात्र विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे, असही ते म्हणाले. 

If Coronas second wave comes reconsider schools opening Hints from Minister of State for Education Bachchu Kadu 

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Coronas second wave comes reconsider schools opening Hints from Minister of State for Education Bachchu Kadu

टॉपिकस
Topic Tags: